कंपनीनं आपल्या साडे सहा हजार कर्मचाऱ्यांना घडवली फ्रान्सची सैर

चीनमधील टायन्स ग्रुप या कंपनीच्या मालकानं आपल्या साडे सहा हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना सुट्टीत फ्रान्सची सैर घडवली आहे. कंपनीच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त मालकाने त्याच्या कर्मचाऱ्यांना ही अविस्मरणीय भेट दिली असून पॅरिसमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सर्वात मोठी मानवी साखळी तयार करुन विक्रमही रचला आहे. 

Updated: May 11, 2015, 01:36 PM IST
कंपनीनं आपल्या साडे सहा हजार कर्मचाऱ्यांना घडवली फ्रान्सची सैर title=

पॅरिस: चीनमधील टायन्स ग्रुप या कंपनीच्या मालकानं आपल्या साडे सहा हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना सुट्टीत फ्रान्सची सैर घडवली आहे. कंपनीच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त मालकाने त्याच्या कर्मचाऱ्यांना ही अविस्मरणीय भेट दिली असून पॅरिसमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सर्वात मोठी मानवी साखळी तयार करुन विक्रमही रचला आहे. 

चीनमधील ५६ वर्षीय उद्योजक ली जिनीअन यांनी १९९५ मध्ये टायन्स ग्रुप या कंपनीची स्थापना केली. ही कंपनी हॉटेल आणि पर्यटन, बायोटेक्नॉलॉजी, ई - कॉमर्स अशा विविध क्षेत्रात कार्यरत असून ली जिनीअन यांचा जर्गातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश होतो. 

ली यांच्या टायन्स समुहाला आता २० वर्ष पूर्ण झाली असून यानिमित्त ली यांनी कंपनीच्या ६, ५०० कर्मचाऱ्यांना एक आगळी वेगळी भेट दिली. ली हे या कर्मचाऱ्यांना थेट फ्रान्समध्ये भ्रमंतीसाठी घेऊन गेले. यासाठी ली यांनी कान्स, मॉनेको इथल्या ७९ थ्री आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुमारे ४,७६० खोल्या बूक केल्या होत्या. कर्मचाऱ्यांच्या या पॅरिस दौऱ्यावर ली यांनी कोट्यावधी रुपये खर्च केल्याचं समजतं. मात्र ली यांच्या या भेटीनं त्यांचे कर्मचारी भलतेच सुखावले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.