www.24taas.com, झी मीडिया, बीजिंग
वायव्य चीनमधल्या कुनीमंगमधल्या रेल्वे स्टेशनवर एका गटानं केलेल्या चाकू हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला असून ११३ जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय.
हा हल्ला नेमका कोणत्या गटानं केला? तसंच याचं कारण काय आहे? हे अद्याप समजलेलं नाही. मात्र, हा अत्यंत सुनियोजित पद्धतीनं केलेला हल्ला होता असं मत प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केलंय.
पोलिसांनी अज्ञात गुन्हेगारांविरुद्ध या गुन्ह्याची नोंद केलीय. स्थानिय वेळेनुसार रात्री नऊ वाजता कुनमिंग रेल्वे स्टेशनवर चाकुनं हा हल्ला केल्याचं पोलिसांनी म्हटलंय.
संवाद समिती `शिन्हुआ`नं दिलेल्या माहितीनुसार, हा एक संघठीत, जाणून बुजून केलेला हिंसक आणि दहशतवादी हल्ला होता.
स्थानिक टेलिव्हिजन चॅनल `के-६`नं दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अनेक हल्लेखोरांना रोखण्यासाठी गोळ्या झाडल्या. जखमींना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
चीनमध्ये सामूहिक चाकू हल्ला ही सामान्य गोष्ट आहे, मात्र, इतक्या मोठ्या पद्धतीनं अशा प्रकारचा हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.