मंदीचा फटका पंतप्रधानांच्या आईला

ब्रिटनच्या खालावलेल्या अर्थव्यवस्थेचा फटका पंतप्रधान डेव्हिड कॅमरॉन यांच्या आईला बसला आहे.

Updated: Mar 12, 2016, 08:31 PM IST
मंदीचा फटका पंतप्रधानांच्या आईला title=

लंडन: ब्रिटनच्या खालावलेल्या अर्थव्यवस्थेचा फटका पंतप्रधान डेव्हिड कॅमरॉन यांच्या आईला बसला आहे. डेव्हिड कॅमरॉन यांची आई मेरी कॅमरॉन यांना आपली नोकरी गमवावी लागली आहे.  

कॉस्ट कटिंगचा भाग म्हणून ब्रिटनमधली लहान मुलांसाठी चालवली जाणारी 44 बालक केंद्र बंद करण्यात येणार आहेत. यातल्या एका बालक केंद्रामध्ये पंतप्रधान कॅमरॉन यांची आई स्वयंसेवक म्हणून काम करत होत्या. 

ब्रिटनमध्ये सध्या 3 हजार बालक केंद्र आहेत. पण त्यावरील खर्च प्रशासनाच्या आवाक्याबाहेर गेला आहे. त्यामुळे डेव्हिड कॅमरॉन यांनी या निधीमध्ये 40 टक्के कपात केली, आणि या निर्णयामुळे आता त्यांच्याच आईला नोकरी गमवण्याची नामुष्की ओढावली आहे. 

या निर्णयामुळे मी निराश झाले आहे, पण सरकारकडे पैसा नसेल तर असे निर्णय घ्यावे लागतात. याबाबत मी माझा मुलगा डेव्हिड कॅमरॉनशी चर्चा केली नाही, मी त्यांच्या कामात ढवळाढवळ करत नाही, अशी प्रतिक्रिया मेरी कॅमरॉन यांनी दिली आहे.