डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला बॉलिवूड स्टार्स राहणार उपस्थित

येत्या वीस जानेवारीला वॉशिंग्टन डीसीमध्ये डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे 45वे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. हा सोहळा भव्यदिव्य होण्यासाठी आतापासूनच तयारी सुरु करण्यात आली आहे.

Updated: Jan 4, 2017, 02:42 PM IST
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला बॉलिवूड स्टार्स राहणार उपस्थित title=

वॉशिंग्टन : येत्या वीस जानेवारीला वॉशिंग्टन डीसीमध्ये डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे 45वे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. हा सोहळा भव्यदिव्य होण्यासाठी आतापासूनच तयारी सुरु करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शिपथविधी समारोहाला, पहिल्यांदाच बॉलिवूडमधले सितारे उपस्थित राहणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर बॉलिवूडचे सेलिब्रिटी रंगारंग कार्यक्रम सादर करणार आहेत. यामध्ये भारतीय संस्कृतीची झलक सादर केली जाणार आहे.