मैदुगिरी : 'बाको हरम' नायजेरियात सक्रिय असलेली इस्लामिक संघटनेच्या दहशतवाद्यांनी हत्याकांडाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. व्हिडिओमध्ये बाको हरमच्या दहशतवाद्यांनी एका शाळेत अनेकांना कोंडले आणि त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला.
संघटनेच्या म्होरक्याने सांगितले की, ते गद्दार असल्यामुळे त्यांना ठार मारण्यात आले. त्यांची हत्या या वर्षी नोव्हेंबरमध्ये बोर्नो राज्यातील बामा येथे करण्यात आली
व्हिडिओत दाखविण्यात आले की, सुमारे ३०-४० लोक एका खोलीत बंद करण्यात आले आहे. त्यांच्यावर दहशतवादी गोळ्या झाडत आहेत. त्यानंतर दहशतवादी एका खोलीत जातात आणि त्यांना निवडून निवडून गोळ्या घालताना दाखविले आहे.
हा लक्ष्य विचलित करणारा व्हिडिओ जारी करून दहशतवाद्यांनी सांगितले की, त्या शाळेची जमीन आम्हांला रक्ताने लाल करायची होती. भविष्यातही गद्दारांवर अशा प्रकारे हल्ले होतील. आता हत्या, विध्वंस आणि बॉम्ब स्फोट आमचे धार्मिक दायित्व आहे.
हा व्हिडिओ एका पत्रकाराने शनिवारी जगासमोर आणला. यापूर्वी बातमी आली होती की उत्तर पूर्व नायजेरियातील वोजामध्ये दोन शाळांमध्ये दहशतवाद्यांनी डझनभर लोकांची हत्या केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.