पाकिस्तानी अँकरनं भारतासाठी केले अश्लिल इशारे

पाकिस्तानमध्ये एका कार्यक्रमादरम्यान एका टीव्ही अँकरनं भारतासाठी आक्षेपार्ह असा इशारा करत भारताविषयी गरळ ओकलीय. 

Updated: Dec 23, 2014, 02:37 PM IST
पाकिस्तानी अँकरनं भारतासाठी केले अश्लिल इशारे title=

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये एका कार्यक्रमादरम्यान एका टीव्ही अँकरनं भारतासाठी आक्षेपार्ह असा इशारा करत भारताविषयी गरळ ओकलीय. 

पाकिस्तानी हॉकी खेळाडूंच्या ‘अश्लील सेलिब्रेशन’नंतर खेळाडूंना बॅन करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून या अँकरनं भारताबद्दल अनेक भडकाऊ शब्द उच्चारले तसंच अश्लिल इशारेही केले. 

पाकिस्तानी टीव्ही चॅनल ‘आवाज टीव्ही’वर पेशावर हल्ल्यानंतर हा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. खेळाडूंवर असलेल्या विषयावला अँकरनं भारतविरोधी रुप देऊन सादर केला. 

‘आपल्याला माहीत असायला हवं की आपला शत्रू कोण आहे. हॉकी खेळाडूंवर तर तुम्ही बंदी आणू शकता करण ते तुमच्या ग्राऊंडमध्ये होते’ असं म्हणत अश्लील इशारा करत या अँकरनं ‘माझ्यावर बंदी आणून दाखवा’ असं आव्हानही देऊन टाकलं. 

‘ही तिसरी हॉकी आहे. प्रत्येक पाकिस्तानीजवळ एक अशीच हॉकी उपलब्ध आहे...’ असंही त्यानं यावेळी म्हटलं. उल्लेखनीय म्हणजे, अनेक महिला आपल्या मुलांसहीत या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. 

हे अँकर महाशय इथंच थांबले नाहीत तर वाघा बॉर्डरवर झालेल्या बॉम्बस्फोटाचा उल्लेख करत ‘हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी तर तुम्ही पळून गेला होतात, पण आम्ही मात्र तेव्हाही तिथंच उपस्थित होतो. आता आमची मुलं मारले गेलेत... पण, आम्ही मात्र अजूनही जिवंत आहोत’ असंही या अँकरनं म्हटलं.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.