www.24taas.com, टेक्सास
अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये खत प्रकल्पात शक्तीशाली स्फोट झालाय. या स्फोटात ६० जण ठार झाल्याचे समजते. स्फोटानंतर खत प्रकल्पाला मोठी आग लागली. प्रकल्पातून उठलेले आगीचे लोळ दूरपर्यंत दिसत होते. स्फोटानंतर घटनास्थळी बचावपथकं दाखल झाली होती. स्फोट कशामुळं झाला हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. जखमींना जवळच्या वाको हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्य़ात आलं.
या स्फोटात प्रकल्पा शेजारील नर्सिंग होम उद्धवस्त झालं आहे. यात अनेक लोक अडकले असण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. स्फोटाचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. स्फोट इतका जबरदस्त आहे होता की, त्याचा आवाज २० कि.मी. पर्यंत ऐकू आला. बचाव कार्यात सहा हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली आहे.
अहवालानुसार स्फोट स्थानिक वेळेनुसार बुधवारी संध्याकाळी ७ वाजून ५० मि. झाला. स्फोटानंतर १०० फूट उंच आगीचे आणि धुराचे लोट उठले होते.