बीजिंग : चीनची राजधानी बीजिंगमध्ये धुक्याची चादर पसरली आहे, मात्र हे धुकं अतिशय विषारी आहे, अखेर सरकारला रेड अलर्ट जारी करावा लागला आहे. वाढत्या प्रदुषणामुळे ही वेळ चीनवर आली आहे. सरकारच्या इशाऱ्यानंतर शाळा आणि कॉलेज तसेच बांधकामाची कामं बंद असणार आहेत.
न्यूज एजन्सी शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, रेड अलर्ट अतिशय गंभीर आहे, कारण या आधी कधीही इशारा देण्याची सरकारला गरज पडली नाही.
हे धुकं जास्तच जास्त दिवस राहण्याची शक्यता चीन सरकारच्या प्रशासनाने व्यक्त केली आहे. एवढंच नाही राजधानी बीजिंगमध्ये सम आणि विषम नंबरच्या गाड्या एक दिवस सोडून बंद राहणार आहेत.
चीनच्या सीसीटीव्ही न्यूज चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार, आठवड्यात बीजिंगच्या काही भागांमध्ये फक्त २०० मीटरवरील दृश्य दिसत होते.
बीजिंगच्या सर्वात प्रभावित असलेल्या भागात विषारी कणांचा स्तर २५६ मायक्रोग्राम प्रति क्यूबिक मीटर होता. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, २५ मायक्रोग्रँम प्रति क्यूबिक मीटर, हा स्तर सुरक्षित आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.