60 लाखांचा हिरेजडीत मुकुट घेऊन पळाली ब्यूटी क्वीन!

मिस एशिया पॅसिफिकचा किताब परत घेतल्यानंतर म्यानमारची पहिली इंटरनॅशनल ब्यूटी क्वीन मेय मायट नोई एक लाख यूएस डॉलर म्हणजे जवळपास 60 लाख रुपयांचा हिरेजडीज मुकुट घेऊन फरार झाली आहे. आयोजकांची फसवणूक आणि उद्धट वागणूकीमुळं तिच्या कडून हा किताब परत घेण्यात आला.

Updated: Aug 30, 2014, 04:11 PM IST
60 लाखांचा हिरेजडीत मुकुट घेऊन पळाली ब्यूटी क्वीन! title=

यंगून : मिस एशिया पॅसिफिकचा किताब परत घेतल्यानंतर म्यानमारची पहिली इंटरनॅशनल ब्यूटी क्वीन मेय मायट नोई एक लाख यूएस डॉलर म्हणजे जवळपास 60 लाख रुपयांचा हिरेजडीज मुकुट घेऊन फरार झाली आहे. आयोजकांची फसवणूक आणि उद्धट वागणूकीमुळं तिच्या कडून हा किताब परत घेण्यात आला.

पन्नास वर्षे लष्करी शासन आणि जगापासून वेगळा पडलेला देश म्यानमारनं दोन वर्षांपूर्वीच इंटरनॅशनल ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेणं सुरू केलं होतं. 18 वर्षीय मेय मायट नोईनं मे 2014 मध्ये सिओलमध्ये मिस एशिया पॅसिफिक वर्ल्डचा किताब जिंकला होता. पण या स्पर्धेचे प्रसिद्धी प्रमुख डेविड किम यांनी सांगितलं की, मिस ब्यूटी क्वीन तिच्या देशात पळून गेली आहे आणि तिनं तिचा फोनही बंद आहे. म्यानमारच्या ऑनलाइन वर्तमानपत्रानुसार, नोई लवकरच पत्रकार परिषद घेणार आहे.

किमने सांगितल की, ''तिच्या यशाला बघून आम्ही तिच्यासोबत एक सिंगिंग आणि व्हिडियो कॉन्ट्रॅक्ट केला होता. आम्ही तिला 5 फूट 7 इंचची युवती दिसण्यासाठी आणि आणखी सुदंर दिसण्यासाठी वेगळा लूक देणार होतो. त्यासाठी दहा हजार डॉलरचा खर्चही केला गेला होता.''

किम पुढे सांगतात की, ''नोई आपल्या आई सोबत सिओलच्या यात्रेवर आली होती. यात्रा ही 10 दिवसांची होती पण दोघी इथं तीन महीने थांबल्या. आयोजकांवर यामुळे आर्थिक खर्च ही वाढला. नोईला सांगितलं गेलं की तिचा किताब आणि ताज दोन्ही परत घेतलं जाऊ शकतं. त्यानंतर तिनं यंगून जाण्यासाठी विमानाच्या तिकीटाची मागणी केली. पण तिकीट येण्यापूर्वीच तिनं दक्षिण कोरिया सोडलं. 60 लाख रुपये किंमतीचा डायमंड क्राउनही ती सोबत घेऊन गेली.''

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.