www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा... भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि नुकताच मिस अमेरिकेचा खिताब आपल्या नावावर करणारी भारतीय वंशाची नीना दावुलुरी... हे तिघेही एकत्र येण्याचे योग जुळून आलेत. येत्या शुक्रवारी ओबामा मनमोहन सिंग यांच्या दुपारच्या भोजनाचं आयोजन करणार आहेत. याचवेळेस भारतीय अमेरिकन नागरिकांचं योगदान लक्षात घेऊन नुकतंच मिस अमेरिका बनलेल्या नीना दावुलुरी हिलाही आमंत्रित करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात येतेय.
११९७ ते २००१ पर्यंत दक्षिण आशियाई मुद्यांवर सहाय्यक परदेशमंत्री म्हणून कारभार सांभाळलेल्या कार्ल इंडरफर्थ यांनी ही आशा व्यक्त केलीय. जेव्हा मनमोहन सिंग आणि ओबामा एकमेकांची भेट घेतील त्यावेळ मिस अमेरिका ठरलेल्या नीनालाही आमंत्रित केलं जाऊ शकतं. मूळ भारतीय वंशाची असलेल्या २४ वर्षीय सुंदरी नीना दावुलुरी हिला नुकतंच मिस अमेरिका हा खिताब देऊन गौरवण्यात आलंय. हा खिताब आपल्या नावावर करणारी नीना पहिलीच भारतीय अमेरिकन महिला ठरलीय. वेगवेगळ्या देशांतील प्रगाढ संबंधांचं हे आणखी एक प्रतिक ठरू शकतं, असं इंडरफर्थ यांना वाटतंय.
मिस अमेरिका सौंदर्य स्पर्धेचे आयोजकही या क्षणाची मोठ्या आतुरतेनं वाट पाहत आहेत. पुढच्या काही महिन्यांमध्ये नीनाच्या भारतीय दौऱ्याचं आयोजनही त्यांच्याकडून केलं जाण्याची शक्यता आहे.
मनमोहन सिंग ओबामा यांची भेट घेण्यासाठी २७ सप्टेंबर रोजी एका दिवसाचा वॉशिंग्टनचा दौरा करणार आहेत. या बैठकीनंतर सिंह आणि ओबामा दुपारचं जेवण एकत्रच घेतील.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.