नवी दिल्ली : पश्चिम आफ्रिकन देश गिनी, सियरा लियॅान आणि लाइबेरियामध्ये इबोला वायरसचा वाढ़ता धोका बघता जागतिक आरोग्य संघटना चिंतेत आहे. पश्चिम आफ्रिकन राष्ट्रं इबोलामुळे आजपर्यंतंच्या सगळ्यात वाईट काळातून जात आहेत. हा वायरस संपू्र्ण जगात पसरणार तर नाही ना, अशी भीती आरोग्य तज्ञांनी व्यक्त केली आहे. इबोला वायरसच्या धोक्यामुळे अमेरिका देखील चिंतेत आहे.
अमेरिकन शांती सेनेने या तीन देशांमध्ये असलेल्या शेकडो अमेरिकन शांती सेनेच्या स्वयंसेवकांना बाहेर काढून घेतलं आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या एका अधिकारीने म्हटलं आहे की दोन स्वयंसेवकांना वेगळं ठेवण्यात आलं आहे, कारण ते या विषाणुमुळे दगावलेल्या एका व्यक्तीच्या संपर्कात आले होते.
काय आहे हा इबोला वायरसः
इबोल वायरस एक असा विषाणु आहे ज्याने इबोला वायरस आजार (ईवीडी) किंवा इबोला रक्तस्रावाचा ताप (ईएचएफ) येतो. प्रथम हा वायरस 1976 मध्ये सुदान आणि काँगो गणराज्यामध्ये आढळले होते. वायरसच्या संपर्कात आल्यानंतर याची लक्षणे 2 दिवसपासून 3 आठवडयामध्ये दिसतात. अतिसार ताप, घसा खवखवणे, स्नायू दुखणे, डोकेदुखी, मळमळ, उलट्या हे या वायरसची लक्षणे आहेत. या वायरसमुळे यकृत आणि मूत्रपिंड काम करणं कमी करतात. या प्रकरणात, काही लोकांमध्ये रक्तस्त्राव सुरू होण्याची समस्या देखील सुरू होते. यावर लस किंवा विशिष्ट उपचार अजूनतरी अस्तितवात नाही. याचा मृत्यु दर कमीत कमी 60 टक्के आहे.
पसरण्याची कारणेः
हा वायरस विशेषत: माकडे, वटवाघळे आणि डुकरांच्या रक्तात किंवा शरीरातील द्रव्य पदार्थामुळे पसरतो. अजून तरी या रोगावर कोणताही उपचार नाही आहे. तरीही हा रोग झालेल्या लोकांच्या मदतीसाठी त्यांना ओरल रिहाईड्रेशन थैरेपी, यात रुग्णाला साखरेचं आणि खारट पाणी पिण्यासाठी दिले जाते किंवा नसांमध्ये पातळ पदार्थ सोडले जातात. या रोगाचा मृत्यु दर खूपच जास्त आहे.
लाइबेरियाच्या राष्ट्राध्यक्ष विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव बघता देशातील शाळा बंद करण्याचे आणि सरकारी कर्मचाऱ्यांना घरीच राहण्याचे आदेश दिले आहेत. इबोलामुळे पश्चिम आफ्रिकेत आतापर्यंत 670 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
डब्ल्यूएचओने दिला इशाराः
जागतिक आरोग्य संघटनेने पश्चिम आफ्रिकेच्या इबोला विषाणू प्रभावित देशांना चेतावनी दिली आहे की ही आरोग्य समस्या नियंत्रणाबाहेर जात आहे आणि अन्य राष्ट्रांमध्ये देखील पसरू शकते. ज्यामुळे अनेकांचे जीवन धोक्यात येईल आणि गंभीर आर्थिक समस्या देखील निर्माण होऊ शकते.
डब्ल्यूएचओचे प्रमुख मार्गरेट चानने गिनी, सियरा लियोन आणि लाइबेरियाच्या नेत्यांना एका प्रादेशिक परिषदेत सांगितले की हा साथीचा रोगावर नियंत्रण आणण्याच्या प्रयत्नांपेक्षा रोगाचा प्रसार जलद गतीने होत आहे. हे नेते या समस्येवर उपाय शोधण्यासाठी 10 दशलक्ष डॉलर आपत्कालीन मदतीच्य़ा अंतर्गत शेकडो अतिरिक्त वैद्यकीय कर्मचाऱ्य़ांच्या नियुक्तीसाठी गिनीची राजधानी कोनाक्रीमध्ये एकत्र आले आहेत.
जागतिक बँक करणार 20 दशलक्ष डॉलरची मदतः
जागतिक बँकचे अध्यक्ष जिम योंग यांनी म्हंटल आहे की या वायरसच्या वाढत्या प्रादुर्भावावर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. ही खुपच दुःखाची गोष्ट आहे की आरोग्याच्या बाबतीत अगोदरचं कमकुवत असलेल्या या तीन राष्ट्रांमध्ये हा रोग त्यांना आणखी कमकुवत करत आहे. जिम योंग किम स्वतः संसर्गजन्य रोगांचे तज्ञ्ज आहेत.
जागतिक बँकेने ही घोषणा तेव्हा केली जेव्हा 35 राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्षांसह आफ्रिकन राष्ट्राचे नेते अमेरिका-आफ्रिका संमेलनासाठी वॉशिंग्टनच्या दौऱ्य़ावर आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.