पॉर्नः गुगल खोलू शकतो तुमची पोल

Updated: Aug 5, 2014, 05:40 PM IST
पॉर्नः गुगल खोलू शकतो तुमची पोल title=

 

 

ह्युस्टन :  चाइल्ड पॉर्नसंदर्भातील सामग्री ठेवणे एका युजरला महागात पडले आहे. गुगलने यांची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर लोकांनी खाजगी इमेलच्या प्रायव्हसी आणि इंटररनेट पुलिसिंगबाबत गुगलच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

अमेरिकेच्या टेक्सासच्या ह्युस्टनमध्ये राहणाऱ्या जॉन हेनरी स्किलर्नबाबत गुगलने एका चाइल्ड प्रोटेक्शन एजन्सीला माहिती दिली. एजन्सीने पोलिसांना सांगितले, त्यानंतर पोलिसांनी त्यालाक अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जॉन हेनरीने पाठविलेल्या इमेलमध्ये एका लहान मुलीचे फोटो होते. पोलिसांनी सर्च वॉरंट जारी करून त्याला अटक केले. 

४१ वर्षीय जॉन हेनरी स्किलर्न हा सेक्स संबधी एका प्रकरणातील आरोपी आहे. त्याला २० वर्षापूर्वी १९९४मध्ये एका ८ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण प्रकरणात  दोषी ठरविण्यात आले होते. 
पोलिसांना स्किलर्नच्या फोन आणि टॅबलेटमध्ये चाइल्ड पॉर्न संबंधी सामुग्री मिळाली. त्यांना असे काही टेक्स्ट मेसेज आणि इमेल सापडले यात त्याने लहान मुलांमध्ये रुची असल्याचे जाहीर केले होते. स्किनर्स हा एका रेस्टॉरंटमध्ये काम करतो. पोलिसांना त्याच्या फोनमध्ये आपल्या परिवारा रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या मुलांचे व्हिडिओही सापडले. 

गुगलने गेल्या काही दिवसांपासून चाइल्ड पॉर्न संबंधीत कठोर पाऊले उचलली आहेत. गुगलने यासाठी इंटरनेट वॉच फाऊंडेशनची मदत केली होती. 

या घटनेनंतर दुसरा प्रश्न गुगलद्वारे प्रायव्हसी भंगाचा मुद्दा समोर आला आहे. आतापर्यंत हे पुढे आले की गुगल तुमच्या सर्चवर योग्य जाहिरात देण्यासाठी जीमेलला स्कॅन करतो. एप्रिलमध्ये गुगलने आपल्या टर्म आण  कंडिशन्सला अपडेट करताना सांगितले की, आमची ऑटोमॅटीक सिस्टिम तुमच्या कन्टेंट (इमेलसह) अनालाइज करते, त्यामुळे तुम्हांला कस्टमाइज्ड सर्च रिझल्टनुसार जाहिरात दिसेल. तसेच स्पॅम आणि मालवेअरची माहिती मिळू शकेल. हा अनालिसिस इमेल पाठविल्यावर, मिळाल्यावर तसेच स्टोर केल्यावर मिळते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.