चिमणीतून पांढरा धूर, अर्जेटीनाचे मारियो नवे पोप

व्हॅटीनक सिटीमध्ये नवे पोप यांची निवड जाहीर झालीये. 266 वे पोप म्हणून अर्जेटीनाचे जॉर्ज मारियो बर्गोग्लिओ यांची निवड जाहीर झाली.

Updated: Mar 14, 2013, 08:16 AM IST

www.24taas.com, व्हॅटीनक सिटी
व्हॅटीनक सिटीमध्ये नवे पोप यांची निवड जाहीर झालीये. 266 वे पोप म्हणून अर्जेटीनाचे जॉर्ज मारियो बर्गोग्लिओ यांची निवड जाहीर झाली. लॅटीन अमेरिकेतील ते पहिलेच पोप आहेत. पोप बेनिडिक्ट 16 वे यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांची दोन तृतीयांश मतांनी त्यांची निवड झाली. 76 वर्षीय पोप जॉर्ज मारीयो आता फ्रान्सीस 1 या नावानं ओळखले जाणार आहेत. जगभरातल्या 115 कार्डिनलमधून त्यांची निवड करण्यात आली. त्यात 5 कार्डीनल हे भारतीय आहेत. दोन दिवसांपासून ही निवड प्रक्रीया सुरु होती.
सिस्टल चॅपेलच्या चिमणीमधून पांढरा धूर बाहेर निघाला. नव्या पोप निवडीचा हा संकेत असतो. गेल्या 600 वर्षात पहिल्यांदाच पोप यांनी राजीनामा दिला होता. पोप बेनिडिक्ट 16 वे यांच्या राजीनाम्यानंतर नवीन पोप निवडीची प्रक्रिया सुरु झाली होती. पोप होण्यासाठी फक्त तीनच अटी आहेत. तुम्ही पुरुष असायला हवं, बाप्तिस्त असायला हवं आणि वय 80 वर्षांपर्यंत जास्त नको.
सिस्टाईन चॅपलच्या छतावर आणि भिंतीवर मायकल अँजेलोच्या अखेरच्या न्यायाचं द लास्ट जजमेंटचं अतिशय भव्य पेन्टिंग साकारण्यात आलंय. आणि त्यामध्ये न्यायाधीशाच्या भूमिकेत येशू आहे. म्हणूनच सिस्टाईन चॅपलमध्येच नव्या पोपची निवडणूक होते. या निवडणुकीदरम्यान सगळ्या कार्डिनल्सना बाहरेच्या जगात कुणाशीही संपर्क साधायला मनाई असते. रेडिओ, टीव्ही आणि मोबाईल्स वापरायला परवानगी नसते.

पोपची निवडणूक प्रक्रिया साधारण तीन दिवस चालते. पोपच्या निवडीसाठी उपस्थित कार्डिनल्सपैकी दोन तृतीयांश मतांची गरज असते. रोज सकाळी आणि दुपारी असं दोन वेळा मतदान होतं. प्रत्येक कार्डिनल्सला एक आयताकृती कार्ड दिलं जातं. त्यावर ते आपल्या पसंतीच्या उमेदवाराचं नाव लिहीतात.
जोपर्यंत स्पष्ट बहुमत मिळत नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया सुरूच राहते. तीन दिवसांत निवड झाली नाही, तर ज्येष्ठ कार्डिनल्स पोपची निवड करतात. पोपची निवड झाल्याचे संकेत देण्याची पद्धत मोठी मजेशीर आहेत. निवडणुकीतल्या प्रत्येक फेरीनंतर चॅपलच्या चिमणीमधून एक विशिष्ट प्रकारचा धूर सोडला जातो. त्या फेरीत पोपची निवड झाली नसली तर एक केमिकल त्या धूरात मिसळलं जातं.
ज्यावेळी पोपची निवड होते, त्यावेळी स्वच्छ पांढरा धूर चिमणीबाहेर सोडला जातो. आणि घंटाही वाजवली जाते तेव्हाच बाहेर असणा-या सगळ्यांना पोपच्या निवडीची बातमी कळते.