न्यू यॉर्क : डिस्कव्हरी चॅनलचा वादग्रस्त शो 'इटन अलाइव्ह' या रविवारी रात्री प्रसारित झाला. या शोचा दावा फोल ठरला आहे. या कार्यक्रमाचा प्रचार केला होता की पर्यावरणवादी आणि जंगली जनावरांवर अध्य करणारे फिल्म मेकर पॉल रॉजली एनाकोंडाच्या तोंडातून परत येणार आहे. पण जेव्हा रॉजलीला अॅनाकोंड़ाने गिळाला सुरूवात केली तेव्हा ते घाबरला आणि टीमला मदत मागितली आणि आपली सुटका करून घेतली. हा व्हिडिओ खूप रोमांचक आहे.
रॉजलीनुसार या विशाल सापांच्या शरिरात का सुरू असते हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बनविला आहे. या व्हिडिओमध्ये रॉजलीने एक खास स्केनप्रूफ सूट घातला आहे. अॅनाकोंडाच्या शरिरातील आतील गोष्टी रेकॉर्ड करण्यासाठी सूटमध्ये कॅमरा लावण्यात आला. या शिवाय अॅनाकोंडाला आकर्षित करण्यासाठी या सूटवर डुक्कराच्या रक्ताचा लेप लावण्यात आला. हा व्हिडिओ शूट करण्यासाठी रॉजलीची संपूर्ण टीम होती. शेवटी हा व्हिडिओ शूट करण्यात त्याच्या टीमला यश मिळाले.
रॉजली जगभरातील वर्षावन वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. रॉजलीच्या अॅनाकोंड़ा एपिसोड वादग्रस्त होता. जगभरातील वन्य जीव प्रेमींनी रॉजलीच्या या प्रयत्नांना विरोध केला. अॅनाकोंड़ाला त्रास देणे आणि त्याच्यावर अत्याचार करण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.