मुलीला सडपातळ आणि सुंदर बनविण्यासाठी खावू घातल्या कृमी

आपली महत्त्वाकांशा पूर्ण करण्यासाठी आई-वडील आपल्या मुलांवर कोणत्या थरापर्यंक जातात याचं एक उदाहरण समोर आलंय. अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये एक धक्कादायक आणि दु:खद घटना समोर आलीय. आपल्या मुलीला सुंदर आणि सडपातळ बनविण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी चक्क कृमी खावू घातल्या आहेत.

Updated: Aug 24, 2014, 08:23 AM IST
मुलीला सडपातळ आणि सुंदर बनविण्यासाठी खावू घातल्या कृमी title=

फ्लोरिडा: आपली महत्त्वाकांशा पूर्ण करण्यासाठी आई-वडील आपल्या मुलांवर कोणत्या थरापर्यंक जातात याचं एक उदाहरण समोर आलंय. अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये एक धक्कादायक आणि दु:खद घटना समोर आलीय. आपल्या मुलीला सुंदर आणि सडपातळ बनविण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी चक्क कृमी खावू घातल्या आहेत.

मुलीनं सौंदर्य स्पर्धेत भाग घेऊन विजय मिळवावा म्हणून आई-वडिलांनी हे कृत्य केलं. तिच्या पोटात दुखू लागल्यानं हा प्रकार समोर आला. पीडित अल्पवयीन मुलीच्या पोटात जंत तपासादरम्यान सापडले. 

सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी आईला मुलीचं वजन कमी करवायचं होतं. जेव्हा मुलीला हॉस्पिटलमध्ये इमरजंसीमध्ये भर्ती केलं गेलं. तेव्हा डॉक्टरांना पहिले वाटलं मुलगी गरोदर आहे की काय, पण तपासानंतर जे पुढे आलं ते यापेक्षा जास्तच धक्कादायक होतं. मुलीच्या आतड्यांना सूज आली होती. तपासानंतर खरं कारण कळलं. 

एका अमेरिकन टिव्ही कार्यक्रमात नर्सने सांगितलं की, मुलगी जेव्हा टॉयलेटमध्ये गेली तेव्हा संपूर्ण टॉयलेट जंतांनी भरलेलं होतं. पीडित मुलीची आई मॅक्सिकोहून जंतांची अंडी विकत आणत होती आणि मुलीचं वजन कमी व्हावं म्हणून तिला जबरदस्तीनं खाऊ घालत होती. या प्रकारानंतर मात्र महिलेनं आपल्या मुलीची क्षमा मागितली. मात्र अजून महिलेविरोधात काही कारवाई केली गेली की नाही, हे कळलं नाहीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.