मुंबई : ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन सध्या वादात सापडलीय... याला कारण आहे यावर विक्रीसाठी दिसलेला एक 'सेक्सी बुरखा'...
सध्या, ब्रिटनमध्ये हॅलोवीनसाठी जोरदार तयारी सुरू आहे. याच निमित्तानं अॅमेझॉन यूकेनं काही नवीन प्रोडक्ट सादर केले होते. यात अरब आणि इस्लाम मानणाऱ्यांसाठी काही वस्तू होत्या.
अॅमेझॉननं सादर केलेल्या कपड्यांमध्ये एक पुरुष अरब स्कार्फ घालून दाखवण्यात आला होता. शिवाय महिलांसाठी सादर करण्यात आलेल्या एक बुरखा महिलांच्या शरीराचा केवळ वरचा भाग झाकण्यासाठी होता खाली पाय मात्र उघडे दाखवण्यात आले होते. हा बुरखा 'सेक्सी साऊदी बुरखा इस्लामिक कॉस्च्यूम' नावानं वेबसाईटवर टाकण्यात आला होता.
यानंतर अॅमेझॉनवर जोरदार टीका झाली. अमेझॉन वर्णभेदी असल्याचाही आरोप यावेळी झाला. प्रखर टीकेनंतर अमेझॉननं हा 'सेक्सी बुरखा' आपल्या साईटवरून हटवलाय.