अल कायदाच्या नव्या भारतीय शाखेचा धोका नाही - अमेरिका

‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेच्या भारतीय उपखंडात नवी शाखा सुरु करण्यात आल्याच्या ‘त्या’ व्हिडिओवर अमेरिकेनं आपली प्रतिक्रिया नोंदवलीय.

Updated: Sep 5, 2014, 01:11 PM IST
अल कायदाच्या नव्या भारतीय शाखेचा धोका नाही - अमेरिका title=

वॉशिंग्टन : ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेच्या भारतीय उपखंडात नवी शाखा सुरु करण्यात आल्याच्या ‘त्या’ व्हिडिओवर अमेरिकेनं आपली प्रतिक्रिया नोंदवलीय.

ही दहशतवादी संघटना म्हणजे अल कायदाच्या नव्या क्षमता विकसित करण्याचा संकेत नाही तसंच या समूहाला निष्क्रिय करण्यासाठी अमेरिकाही प्रतिबद्ध असल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. 

‘अल कायदाच्या या घोषणेकडे आम्ही अल कायदाच्या नव्या क्षमता वाढीस लागण्याची शक्यता म्हणून पाहत नाही’ असं व्हाईट हाऊसमध्ये नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिलच्या प्रवक्ता सी. हेडन यांनी म्हटलंय. ‘आम्ही अल कायदाच्या नव्या शाखेशी संबंधित घटनेबद्दल ऐकलंय. अमेरिका अल-कायदाला निष्क्रिय करण्यासाठी प्रतिबद्ध आहे... आम्ही हे सुनिश्चित करण्यासाठी प्रतिबद्ध आहोत की हीच संघटना अमेरिकन जनतेसाठी पुन्हा एकदा धोका निर्माण करू शकणार नाही... अल कायदाचा प्रभाव रोखण्यासाठी... नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी... हिंसक धर्मांवाद्यांशी लढण्यासाठी आणि परिस्थिती सामान्य ठेवण्यासाठी अमेरिकेनं या क्षेत्रात मजबूत दहशतवादी विरोधी भागीदारी केलीय’ असंही यावेळी त्यांनी म्हटलंय. 

वर्ष 2008 नंतर मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिका आणि भारतादरम्यान दहशतवादविरोधी मुद्यांवर सहाय्य करण्यासाठी सहमती झालीय. सद्य पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या शेवटीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेण्यासाठी वॉशिंग्टनला जाणार आहेत. तेव्हा दोन्ही देशांदरम्यान चर्चेत हा एक महत्त्वाचा मुद्दा असेल, असं म्हटलं जातंय. 

‘अमेरिकेनं अल कायदाला गंभीर धक्का दिलाय. आम्ही अमेरिकन जनतेला धोका निर्माण करण्याऱ्या समुहाला आणि त्याच्या सहयोगी संघटनेला धडा शिकवण्याचा प्रयत्न सुरुच ठेऊ’ असंही हेडन यांनी म्हटलंय. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.