काळा पैसा परत देशात आणणं हीच प्राथमिकता - नरेंद्र मोदी

आज  जी २० शिखर परिषदेपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशांमध्ये जमा असणारा काळा पैसा भारतात परत आणणं हीच सरकारची प्राथमिकता असल्याचं म्हटलंय. हा उद्देश साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहयोगाची गरज असल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी म्हटलंय. 

Updated: Nov 15, 2014, 11:04 AM IST
काळा पैसा परत देशात आणणं हीच प्राथमिकता - नरेंद्र मोदी title=

ब्रिस्बेन : आज  जी २० शिखर परिषदेपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशांमध्ये जमा असणारा काळा पैसा भारतात परत आणणं हीच सरकारची प्राथमिकता असल्याचं म्हटलंय. हा उद्देश साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहयोगाची गरज असल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी म्हटलंय. 

ऑस्ट्रेलियातल्या ब्रिसबेनमध्ये जी-20 देशाची आज शिखर परीषद पार पडणार आहे. देशभरातील 20 देशाचे शक्तीशाली नेता या परिषदेत सहभागी होणार आहे. या शिखर परिषदेत भारताकडून कोणता अजेंडा मांडला जाणार याकडे जगाच लक्ष लागलंय. दरम्यान सैय्यद अकबरुद्दीन यांनी शिखर परीषदेत काळ्या पैशांचा मुद्दा अजेंड्यावर सर्वात पुढे असल्याचं म्हटलंय. शिखर परीषदे होण्या अगोदर नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स देशातील राष्ट्रध्यक्षांची भेट घेतली. या भेटीत मोदींनी ब्रिक्स देशांनी परस्परात सहकार्य वाढवण्याची अपील केलीय. 

जी २० शिखर परिषदेपूर्वी विकसनशील अर्थव्यवस्था असणाऱ्या पाच देशांचा समूह 'ब्रिक्स'च्या (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) नेत्यांची अनौपचारिक भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला.   

यावेळी, मोदींशिवाय चीनचे पंतप्रधान शी शिनपिंग, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती जॅकब जुमा आणि ब्राझीलचे राष्ट्रपती डिल्मा रोसेफ हेदेखील या अनौपचारिक भेटी दरम्यान उपस्थित होते.   

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.