www.24taas.com, झी मीडिया, ब्रिटन
‘गुगल’ने त्यांच्या सर्च इंजिनवरून अश्ली्ल छायाचित्रे ब्लॉक करण्याचा निर्णय घेण्याच्या एका दिवसानंतर ब्रिटनच्या लेंड्यूडनोमधील प्रकरण समोर आले आहे. १० वर्षीय मुलाने इंटरनेटवर पोर्नोग्राफी बघून सात वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार करण्याचे प्रकरण उघडकीस आले.
या मुलाला पोर्नोग्राफीचं जबरदस्त व्यसन लागल होतं. जवळपास दोन वर्षापासून हा मुलगा तिच्यावर अत्याचार करत राहिला. एवढच नव्हे तर पॉर्न फिल्ममध्ये दाखवण्यात येणारी दृश्यांचा वापर तो तिच्यावर करत होता.
ब्रिटनमधील मोल्ड क्राउन न्यायालयामध्ये मुलाच्या गुन्हेगारी कृत्याला उघड करताना सांगितले, की इतक्या लहान वयात या मुलाला पोर्नोग्राफीचं व्यसन लागलं तरी कसं? मुलाने आपला गुन्हा स्वीकार असून अद्यापही त्याला तुरूंगात टाकण्यात आले नाही.
न्यायालयाने संपूर्ण प्रकरण ऐकल्यानंतर मुलाला बालसुधारगृहात पाठवण्याचा आदेश दिला आहे. यासोबतच पोलीस रेकॉर्डमध्ये ‘सेक्स ऑफेंडर’ म्हणजेचं सेक्स संबधी अपराधांचे व्यसनी असण्याबाबत त्याची नोंद करण्यात आली आहे.
इंटरनेट ही आजच्या पिढीची गरज बनली आहे. शाळकरी मुलांनाही त्यांचे प्रोजेक्ट करण्यासाठी इंटरनेट आवश्यक असतं. पण किशोरवयीन मुलं फक्त शाळेच्या कामासाठीचं याचा उपयोग करतात की याचा गैरवापरही केला जातो. इंटरनेटवरील अश्लिल फोटो अथवा सिनेमे अल्पवयीन मुलांना पाहता न यावे यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत.
अल्पवयीन मुले गुगल आणि मायक्रोसॉफ्ट बिंगचा वापर करून अश्लीाल छायाचित्रे पाहतात. त्यामुळे या दोन्ही साईटने अशा छायाचित्रांवर बंदी घालावी अशी मागणी ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरॉन यांनी केली होती. त्यानुसार गुगलने त्यांच्या सर्च इंजिनवरून अश्लींल छायाचित्रे ब्लॉक करण्याचा कालच निर्णय घेतला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.