मुंबई: ब्राझीलमध्ये एक संशोधकांच्या टीमला तब्बल ९ हजार वर्षांपूर्वींचे मानवी कवट्या सापडल्या आहेत. नरबळी देण्याचा हा सर्वात जुना पुरावा असल्याचं पुरातत्त्व विभागाच्या संशोधकांचं म्हणणं आहे.
ब्राझीलच्या पूर्व-मध्य परिसरात असलेल्या पुरातन भाग लापा डो सांतोमध्ये जवळपास १२ हजार वर्षांपूर्वी मानवी वस्ती असल्याचे पुरावे सापडले. २००७मध्ये रिसर्चर टीमला दफन केलेल्या एका मृतदेहाचे अवशेष सापडले. त्या अवशेषांमध्ये कवटी, जबडा, दोन कापलेले हात इत्यादी सापडलं.
संशोधकांना आढळलं की, हात आणि कवटी एकमेकांच्या विरुद्ध दिशेला ठेवली गेली होती आणि त्यांच्या जबड्यामध्येही कापल्याच्या खुणा दिसल्या.
आणखी वाचा - दक्षिण आफ्रिकेत गुहेमध्ये सापडलेत प्राचीन मानवी अवशेष
मॅक्स प्लॅंक इन्सिट्युट फॉर इव्हॉल्युशनरी एंथ्रोपॉलजी जर्मनीच्या आंद्रे स्ट्रॉस आणि सहकाऱ्यांनी एक्सलरेटर मास स्पेक्ट्रामेटीचा वापर करत हे अवशेष ९ हजार वर्षांपूर्वीचे असल्याचं म्हटलंय.
अवशेषांचा अभ्यास केल्यानंतर संशोधकांनी हे मत मांडलंय की, धार्मिक कर्मकांडासाठी नरबळी देत असल्याचं हे प्रकरण असू शकतं. रिसर्चचा रिपोर्ट पीएलओएस वन मॅगझिनमध्ये प्रकाशित झालाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.