मुंबई : दक्षिण अफ्रिकेतून एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. येथे शाळेत शिकणाऱ्या मुलींबाबतीत एक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. शाळेत शिकणाऱ्या अनेक विद्यार्थिनी या गर्भवती असल्याचं समोर आलं आहे. कमी वयात शारीरिक संबंध ठेवल्यामुळे येथे २० हजार मुली गर्भवती असल्याचं समोर आलं आहे.
कमी वयात शारीरिक संबंध ठेवणाऱ्या मुलींची ही घटना समोर आल्यामुळे येथील महापौर देखील चिंतीत आहे. महापौरांनी मुलींना शारीरिक संबंधपासून दूर ठेवण्यासाठी एक मोहिम देखील सुरु केली आहे. जी विद्यार्थिनी आपली वर्जिनिटी कायम ठेवेल त्या विद्यार्थिनीला पगार देणार असल्याचं महापौरांनी जाहीर केलं आहे याचं अनेक विद्यार्थिनींनी स्वागत देखील केलं आहे. तर काहींनी याचा विरोध देखील केला आहे.