... आणि २० कोटी वर्षांपूर्वीचा डायनासोर सापडला

अंगावर काटे असलेला, पोपटासारखी चोच आणि वटवाघळासारखे दात असलेल्या एका छोट्या डायनासोरच्या एका विशिष्ट जातीला संशोधनकर्त्यांना ओळख पटलीय.

Updated: Oct 4, 2012, 04:47 PM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन
अंगावर काटे असलेला, पोपटासारखी चोच आणि वटवाघळासारखे दात असलेल्या एका छोट्या डायनासोरच्या एका विशिष्ट जातीला संशोधनकर्त्यांना ओळख पटलीय. या जातीच्या डायनासोरची ‘ज्युरासिक पार्क’मध्येही एक छोटी भूमिका असल्याचंही म्हटलं जातंय.
या संशोधनाला ऑनलाईन जर्नल ‘जू कीज’मध्ये प्रकाशित करण्यात आलंय. शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये डायनासोर विशेषज्ञ पॉल सेरेनो यांनी पहिल्यांदा हा शोध लावलाय. सेरेनो यांनी न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना म्हटलंय की, ‘मी या प्राण्याला पाहिल्या पाहिल्याच अंदाजा आला की हा डायनासोरची अशी जात आहे, जिची ओळख आत्तापर्यंत कुणालाही पटू शकलेली नव्हती.’
यानंतर विशेषज्ञ या डायनासोरच्या नमून्याच्या माध्यमातून संशोधनाला सुरुवात केली की हा नेमका कसा दिसत असेल… सेरेनो यांनी ‘पेगोमैस्टक्स अफ्रीकानस’ असं नाव दिलंय. ‘पेगोमैस्टक्स अफ्रीकानस’ म्हणजे आफ्रिकेतील एक मोठी दरी... सेरेनो यांच्या मते डायनासोर ६१ सेंटीमीटरपेक्षा छोटा होता आणि त्याचं वजन एका मांजरीपेक्षाही कमी होतं. सेरेनो यांच्या मते, २० कोटी वर्षांपूर्वी याचं अस्तित्व पृथ्वीवर होतं.