चीनच्या पानबुडीला समुद्रात सापडला एक रहस्यमय जीव

हिंदी महासागरमध्ये दुर्मिळ खनिजांचा शोध घेण्यासाठी समुद्राच्या तळाशी गेलेली चीनची पानबुडी जियाओलोंगनं खोल पाण्यात राहण्याऱ्या जीवांच्या बाबतीतील १७ वस्तू गोळा केल्या आहेत. यात दोन जीव असे आहेत ज्यांच्याबद्दल अद्याप कोणत्याच वैज्ञानिकांना माहिती नाहीय.

Updated: Jan 15, 2015, 10:30 PM IST
चीनच्या पानबुडीला समुद्रात सापडला एक रहस्यमय जीव title=

बीजिंग: हिंदी महासागरमध्ये दुर्मिळ खनिजांचा शोध घेण्यासाठी समुद्राच्या तळाशी गेलेली चीनची पानबुडी जियाओलोंगनं खोल पाण्यात राहण्याऱ्या जीवांच्या बाबतीतील १७ वस्तू गोळा केल्या आहेत. यात दोन जीव असे आहेत ज्यांच्याबद्दल अद्याप कोणत्याच वैज्ञानिकांना माहिती नाहीय.

दक्षिण पश्चिम हिंद महासागरात उपस्थित या पानबुडीवर जेव्हा समुद्र जीव सी कुकूम्बरच्या आकाराचा जीव आणला गेलाय. तर तो जीव तीन भागात आपोआप तुटला, वेगळा झाला. या जीवाचा आकार इतका पारदर्शक होता की, वैज्ञानिक यातील निळ्या आणि भुऱ्या रंगाचा विसरा स्पष्ट पाहू शकत होते.

स्टेट ओशनिक अॅडमिनिस्ट्रेशनच्या सेकंड इन्सिट्यूट ऑफ ओशनोग्राफीचे संशोधक लू बो यांनी सांगितलं, 'हा एक विशेष प्रकारचा सी कुकू्म्बर असू शकतो. मात्र आम्ही प्रयोगशाळेत याचं परीक्षण करून त्याबद्दलची माहिती गोळा करावी लागेल. ' स्थानिक सरकारी वृत्तसंस्था शिन्हवानं ही माहिती दिलीय.

संशोधकांनी सांगितलं की, दुसरा विचित्र जीव ३३० सेंटीमीटर लांबीचा आणि तीन सेंटीमीटर रूंद आहे आणि त्याबद्दल वैज्ञानिक पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. हा गुलाबी रंगाच्या सापासारखा जीव आहे. वातावरणातील बदलामुळे त्याच्या शरीरावर बुडबुड्यासारखी आकृती निघून आलीय.

लू बा यांनी सांगितलं, 'हे दोन्ही जीव नवीन जातीच्या असू शकतात. मात्र असलेल्या साधनांचा वापर करून आम्ही या जीवांबद्दल काही सांगू शकत नाही.' पानबुडीनं समुद्राच्या तळातून एकूण ६.९ किलो सामान एकत्र केलंय. ज्यात १५ झिंगे, पाणी आणि सल्फाइचा समावेश होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.