एका वर्षाच्या चिमुकलीची ‘स्मार्ट’ कार खरेदी

एका वर्षाच्या मुलीने केलीय स्मार्टफोनवरून कार खरेदी. खरंतर ही खरेदी चुकीने झाली होती मात्र मुलीचे वडील आता ही कार विकत घेतायत.

Updated: Jul 12, 2013, 06:56 PM IST

www.24taas.com,झी मीडिया,न्यू यॉर्क
शॉपिंगची आवड कोणाला नाही. लहानापासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांसाठीच खरेदी म्हणजे आवडीचा विषय. ही आवड मात्र एका वर्षाच्या मुलीलापण आहे, थोडं चमत्कारिक वाटतयं ना. पण खरंच एका वर्षाच्या मुलीने केलीय स्मार्टफोनवरून कार खरेदी. खरंतर ही खरेदी चुकीने झाली होती मात्र मुलीचे वडील आता ही कार विकत घेतायत.
ऑरेगनच्या पोर्टलंडमध्ये राहणारे पॉल स्टॉट यांना एक दिवस एक मेसेज मिळाला की त्यात ‘ईबे’कडून शुभेच्छा देण्यात आली होती. ‘तुम्ही २२५ डॉलर म्हणजेच १३४५५ रुपयात १९६२ सालचे मॉडेल असलेली ऑस्टिन-हीले- स्प्राइट ही कार खरेदी केलीय’ हा मेसेज वाचून पॉल आश्चर्यचकित झाले. त्यांनी तर अशी कोणतीही खरेदी केली नव्हती. यासाठी त्यांनी केलेल्या ऑर्डरची तपासणी केली तेव्हा कळलं ही खरी गोष्ट काय आहे. खरंतर त्यांची छोटी मुलगी सोरेलाने खेळता खेळता स्मार्टफोनमधील ‘ईबे’चे अॅप चालू केले. या अॅपद्वारे आपण ऑनलाइन खरेदी करु शकतो. ती आपल्याच नादात फोनशी खेळत राहिली आणि चुकीने तिने कारची खरेदी केली.

खरेदी केलेली ही कार ऑरेगनमध्येच आहे. चुकीने खरेदी झालेल्या या कारला स्टॉट पती-पत्नी एक आठवणीतली भेटीच्या रुपात बदलणार आहेत. ही कार दुरुस्त करावी आणि मुलीच्या १६ व्या वाढदिवसाला भेट द्यावी, असे पॉल यांना वाटतयं.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.