१ कोटी ८० लाख रूपये उत्पन्न, पण अजूनही रिक्त आहे हे पद

Updated: Mar 1, 2016, 06:33 PM IST
१ कोटी ८० लाख रूपये उत्पन्न, पण अजूनही रिक्त आहे हे पद title=

नवी दिल्ली : चांगला जॉब आणि चांगला पगार हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण दिवसरात्र मेहनत करत असतात. पण तरी अशी नोकरी मिळत नाही. अशातच एक तुम्हाला विचार करायला लावणारी नोकरी समोर आली आहे. ज्यासाठी १ कोटी ८० लाख रूपये वार्षिक उत्पन्न असणार आहे.

न्यूझीलंडमधील एका रुग्णालयात अनेक वर्षापासून एका डॉक्टरचं पद खाली आहे. या क्लिनिक वर्षाला कमाई आहे तब्बल १ कोटी, ८० लाख, ९२ हजार रुपये आहे. पण हे क्लिनिक गेली ४ वर्षांपासून एकच डॉक्टर सांभाळतो. 

डॉ. केन्नी हे १० तास काम करत असतात. या रुग्णालयात रोज हजारो रुग्ण येतात आणि फक्त एकच डॉक्टर या रुग्णालयात काम करतो. आता डॉ. केन्नी यांना एका सहकाऱ्याची गरज आहे. त्यांना आता या रुग्णालयातून रिटारर्ड व्हायचं आहे.