‘ह्युफिग्टंन पोस्ट’ची माघार... सोनियांचं नाव हटवलं

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या बहुआकडी संपत्तीवरून वाद सुरू झालाय. दरम्यान, हे संपत्तीचे आकडे उघड करणाऱ्या ‘हफिंग्टन पोस्ट’ या अमेरिकन वेबसाइटनं या वादातून काढता पाय घेत सोनिया गांधींचं ‘डिलीट’ मारलंय. ‘हफिंग्टन पोस्ट’नं जाहीर केलेल्या श्रीमंत २० नेत्यांच्या यादीत आता मात्र सोनिया गांधींचं नाव दिसत नाही.

Updated: Dec 3, 2013, 03:48 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवीन दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या बहुआकडी संपत्तीवरून वाद सुरू झालाय. दरम्यान, हे संपत्तीचे आकडे उघड करणाऱ्या ‘हफिंग्टन पोस्ट’ या अमेरिकन वेबसाइटनं या वादातून काढता पाय घेत सोनिया गांधींचं ‘डिलीट’ मारलंय. ‘हफिंग्टन पोस्ट’नं जाहीर केलेल्या श्रीमंत २० नेत्यांच्या यादीत आता मात्र सोनिया गांधींचं नाव दिसत नाही. ‘सोनिया गांधींची नेमकी संपत्ती किती याबद्दल संपादकांना खात्री नाही’ असं सांगत या वेबसाईटनं खेद व्यक्त केलाय तसंच या यादीतून सोनियांचं नावही काढून टाकलंय.
एका संपादकीय नोटमध्ये या वेबसाईटनं म्हटलंय की, सोनिया गांधी आणि कतारचे ‘माजी आमिर’ हामिद बिन खलीफा अल थानी यांची नाव या यादीतून काढून टाकण्यात आली आहेत. एका तिसऱ्याच वेबसाईटनं तयार केलेल्या यादीवरून सोनियांचं नावाचा या यादीत समावेश करण्यात आला होता.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, सोमवारी, या वेबसाईटनं जाहीर केलेल्या श्रीमंतांच्या यादीत सोनिया गांधी यांची संपत्ती लंडनच्या राणीपेक्षा जास्त असल्याचं सांगण्यात आलं होतं. या ‘हाफिंग्टन पोस्ट’नं जगातील सर्वांत जास्त श्रीमंत २० पुढाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली होती. या यादीत सोनिया गांधी बाराव्या स्थानी आहेत, असं सांगण्यात आलं होतं. ‘हफिंगटन पोस्ट’ च्या यादीत सोनिया गांधीची संपत्ती दोन अरब डॉलर इतकी असल्याचं सांगण्यात आलं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.