www.24taas.com, झी मीडिया, लंडन
नुकतंच लंडनमधल्या ‘युगोव’ या संस्थेनं जगभरातील प्रशंसनीय व्यक्तींची एक यादी तयार केलीय. या यादित भारताच्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं पाचवा क्रमांक पटकावलाय. अर्थातच, केवळ भारतातील सर्वेक्षणात मात्र मास्टर ब्लास्टरलाच पहिल्या क्रमांकाचं स्थान मिळालं.
‘युगोव’नं या यादित जगभरातील ३० प्रशंसनीय व्यक्तींचा उल्लेख केलाय. ही यादी तयार करण्यासाठी या संस्थेनं तब्बल १३ देशांमध्ये चाचणी घेतली होती. यात ‘मायक्रोसॉफ्ट’चे बिल गेटस् यांना पहिल्या क्रमांकावर स्थान मिळालंय. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना दुसरा तर तर रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळालंय. या यादीत सहा महिलांचाही समावेश आहे. यादीमधील इतर महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा १३ व्या स्थानावर आहेत.
या ३० जणांमध्ये सात भारतीयांनी स्थान पटकावलंय. सचिन तेंडुलकर पाचव्या, नरेंद्र मोदी सातव्या, अमिताभ बच्चन नवव्या, ए. पी. जे अब्दुल कलाम दहाव्या, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे चौदाव्या, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अठराव्या, तर उद्योगपती रतन टाटा तिसाव्या स्थानावर आहेत.
या यादीत यांनी पटकावलंय पहिल्या दहामध्ये स्थान...
१) बिल गेटस्
२) बराक ओबामा
३) व्लादिमीर पुतीन
४) पोप फ्रांसिस
५) सचिन तेंडुलकर
६) शी जिंगपिंग
७) नरेंद्र मोदी
८) वॉरेन बफेट
९) अमिताभ बच्चन
१०) अब्दुल कलाम
यादीत या सहा महिलांना मिळालंय स्थान...
* राणी एलिझाबेथ (१७ व्या स्थानावर)
* अँजेलिना जोली, हॉलीवूड अभिनेत्री (१९ व्या स्थानावर)
* ओफ्रा विन्फ्रे, टीव्ही शो होस्ट (२० व्या स्थानावर)
* अँजेला मर्केल, जर्मनीच्या चान्सलर (२६ व्या स्थानावर)
* हिलरी क्लिंटन, अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री (२७ व्या स्थानावर)
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.