सुनीता विल्यम्स अंतराळात पोहोचली

अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्स आपल्या सहकार्ऱ्यांसह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचली. तिघांनी रशियाचे अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला यशस्वीपणे जोडले.

Updated: Jul 19, 2012, 11:41 PM IST

www.24taas.com, ह्यूस्टन

अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्स आपल्या सहकार्ऱ्यांसह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर  पोहोचली. तिघांनी रशियाचे अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला यशस्वीपणे जोडले.

नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स, रशियाच्या सोयुझचे कमांडर युरी मालेनचेन्को आणि जपानच्या एरोस्पेस एक्‍सप्लोरेशन एजन्सीचे फ्लाइट इंजिनिअर अकिहिको होशिडे यांचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आज आगमन झाले.

गेले दोन दिवस ते पृथ्वीभोवती परिक्रमा करीत होते. सोयुझ टीएमए-०५ एम अंतराळयान तिघांनी यशस्वीपणे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला जोडले.  १५ जुलै रोजी कझाकिस्तानमधील बैकनूर कॉस्मोडॉमवरून तिघांनी सोयुझ अंतराळयानातून यशस्वी उड्डाण केले होते.