विकीलिक्सची गळती होईल का फिक्स?

आर्थिक नाकेबंदीने विकिलिक्सचे कंबरडे मोडलं आहे, त्यामुळेच अमेरिकेचे गुप्त दस्ताऐवजांचे प्रकाशन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय विकिलिक्सने घेतला आहे.

Updated: Oct 25, 2011, 02:56 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

आर्थिक नाकेबंदीने विकिलिक्सचे कंबरडे मोडलं आहे, त्यामुळेच अमेरिकेचे गुप्त दस्ताऐवजांचे प्रकाशन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय विकिलिक्सने घेतला आहे. आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं तसेच निधी उभारण्यावर भर देणार असल्याचं विकिलिक्सचा संस्थापक ज्युलिअन असांजे म्हटलं आहे.

 

विकिलिक्सने जगभरातील अमेरिकन वकिलाती आणि सरकारमधील गुप्त पत्रव्यवहार, दस्ताऐवज आणि माहितीची सनसनाटी गुपितं जगासमोर उघड केली. त्यामुळेच विकिलिक्सच्या मुसक्या व्हिसा, मास्टरकार्ड आणि इतर कंपन्यांनी आवळल्या आहेत.

 

या कंपन्यांनी विकिलिक्सची पुरती आर्थिक नाकेबंदी केली आहे. या कंपन्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं असांजे म्हटलं आहे. व्हिसा आणि मास्टरकार्ड कंपन्यांनी घेतलेली भूमिका राजकीय दबावापोटी असल्याचीही प्रतिक्रिया असांजे व्यक्त केली आहे. विकिलिक्सने केलेल्या भांडाफोडीने इराक आणि अफगाणीस्तान युध्दा संदर्भातील वास्तव जगासमोर आल्याने अमेरिकन सरकारला नामुष्कीचा सामना करावा लागला.