www.24taas.com, पॅरीस
युरोपमध्ये असणारी आर्थिक मंदी आणि त्यामुळे तेथील नोकरदार वर्गाला बसणारा फटका ही काही नवी बाब राहिलेली नाही. मात्र खुद्द राष्ट्राध्यक्षांच्या पगारातच कपात करण्यात आली आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रॅकॉईस होलांड व पंतप्रधान जेन मार्क एरॉल्ट यांच्या वेतनात ३० टक्के कपात करण्याच्या प्रस्तावाला राष्ट्रीय विधानसभेतील कनिष्ठ सभागृहाने मंजुरी दिली.
याचबरोबर इतर मंत्र्याच्या वेतनातही ३० टक्के कपात करण्यात येणार आहे. युरोपातील आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्षांनी मे महिन्यात वेतनात कपात करण्याची घोषणा केली होती. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना २१,३०० युरो इतके वेतन होते. आता त्यांना दरमहा १४,९१० युरो वेतन मिळेल. तर मंत्र्यांना दरमहा ९९४० युरो वेतन मिळेल.