भारत - चीन सीमेवर सैन्य करणार तैनात

लष्करात भरती करण्यात आलेल्या सैनिकांना भारत-चीन सीमेवर तैनात करण्यात येणार असल्याचे, सूत्रांनी म्हटले आहे.

Updated: Nov 2, 2011, 09:55 AM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली 

 

भारताच्या सीमेजवळ चीनी सैनिकांच्या वाढत्या हालचालींमुळे चिंतीत असलेल्या केंद्र सरकार पुढील पाच वर्षात भारतीय लष्करात एक लाख सैनिकांची भरती करण्याच्या विचारात आहे. लष्करात भरती करण्यात आलेल्या सैनिकांना भारत-चीन सीमेवर तैनात करण्यात येणार असल्याचे, सूत्रांनी म्हटले आहे.

 

संरक्षण मंत्रालयाने लष्कराच्या अधुनिकीकरणासाठी एका योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेत भारत-चीन सीमेवर चार नवीन डिव्हिजन तैनात करण्याचा प्रस्ताव आहे. यातील दोन डिव्हिजन माऊंटेन स्ट्राइक कॉर्पचा भाग असणार आहेत.

 

उत्तराखंड आणि लडाख येथे दोन स्वतंत्र डिव्हिजन असणार आहेत. चीनच्या सैन्यावर लक्ष ठेवण्यासाठी भारत मानवरहित विमान आणि छोटी हेलिकॉप्टर तैनात करण्याच्या विचार आहे.