प्रोजेक्ट 'स्टार ट्रेक'

अंतरिक्ष जीवन आणि रहस्यमय खगोल यासारख्या गोष्टी अंतराळ व्यापून गेलय. खगोलशास्त्रज्ञ अशा रहस्यमय गोष्टीच्या बाबत नेहमीच माहितीच्या शोधात असतात. त्यांची तयारी ही अविरत सुरुच असते.

Updated: Dec 8, 2011, 03:42 AM IST

झी २४ तास वेब टीम, वॉशिंग्टन

 

अंतरिक्ष जीवन आणि रहस्यमय खगोल यासारख्या गोष्टी अंतराळ व्यापून गेलय. खगोलशास्त्रज्ञ अशा रहस्यमय गोष्टीच्या बाबत नेहमीच माहितीच्या शोधात असतात. त्यांची तयारी ही अविरत सुरुच असते. करोडो प्रकाशवर्षाच्याही पुढे असणाऱ्या या ग्रहांच्या शोधात आता वैज्ञानिक गढून गेले आहेत. एक असं यान बनवलं जातंय, की ज्याचा वापर करुन करोडो किलोमीटरचा अवधी काही तासात संपवला जाईल.  ग्रह-ताऱ्यांचा प्रवास यामुळे आता सहज शक्य होणार आहे.

 

वैज्ञानिकांची एक टीम टेलिपोर्टेशन च्या नियमांनुसार काम करतेय. या प्रोजेक्टला काहीजण स्टार ट्रेक म्हणून ओळखतात तर काही जण याला टाईम मशीन म्हणूनही ओळखतात. या प्रोजेक्टवर काम करणा-या संशोधकानी हा ठाम दावा केलाय की, या प्रोजेक्टच्या यशामुळे करोडो किलोमीटरचे अंतर चुटकीसरशी कमी होणार आहे. लक्षावधी अणुरेणूचा अभ्यास करुन या टेलीपोर्टचा वापर होणार आहे. या सगळ्याचा अभ्य़ास केल्यानंतर प्रकाशाच्या गतीपेक्षा जास्त वेगाने संदेशवहन केले जाणार आहे. त्या अभ्यासानंतर मानवी देहाची संरचनेचा अभ्यास पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर या अभिनव प्रोजेक्टमध्ये मानवाचे एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर टेलीपोर्टींग केले जाईल. याची चाचणीही यशस्वी झालीय़. २००६ साली डेन्मार्कमधल्या नील्स बोर इन्स्टीट्युटमधल्या वैज्ञानिकानी लेझर किरणांच्या सहाय्याने अनेक अणुरेणूने बनवलेला अतिसुक्ष्म पदार्थ पाठवण्यात आला. आणि काही अंतरावर त्याची हुबेहूब प्रतिकृती उमटली गेली होती.

 

एकीकडे हा प्रयोग सुरु आहे तर दुसरीकडे स्टीफन हॉकीग्स आणि त्याच्या साथीदाराचा एका नव्या यानाचा शोधप्रयत्न सुरुच आहे. ज्याचं वंगण हे परमाणुशक्ती आणि घर्षाणाच्या नियमानुसार चालून प्रकाशवेगाच्या कैकपटीने पुढे जाईल. स्टीफन हॉकीन्स यानी दावा केलाय, की मनुष्याला हा प्रवास करण्यासाठी स्पेस अँड टाईम नुसारच वागावं लागेल. ज्यानुसार या यानाला परमाणु रिएक्टरला प्रतिसेकद एक हजार किलोमीटरचा वेग देण आवश्यक आहे आणि अंतरिक्षप्रवासाच्या वाटेवर येणारे ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करुन हे यान प्रकाशाच्या वेगापेक्षा एक लाख किलोमीटर प्रतिसेकंद करता येणं शक्य आहे का याचा विचार केला जातोय.

 

या दोन्ही शोधाच्या निरीक्षणावरुन एवढ स्पष्ट होतयं की, अंतरिक्षामध्ये असलेल्या त्या ग्रहाच्या शोधात वैज्ञानिकांची प्रचंड मेहनत सुरु झालीय. आता फक्त एवढच पाहायचंय की या दोन शोधात माणूस टेलिपोर्टेशनच्या वेगाने अगोदर पोहोचतोय कि प्रकाशाच्या वेगाच्या कैकपटीने पुढे असणाऱ्या स्पेसशिपने.