www.24taas.com, पॅरीस
आल्जेरियन वंशाचा एक आतंकवादी तालिबानच्या सूचनेवरून पॅरीसमधील भारतीय दूतावासावर हल्ला करण्याच्या बेतात होता. फ्रांसच्या सुरक्षा पथकाने या आतंकवाद्याला घातपात करण्यापूर्वीच मारण्यात आलं आहे. मृत आतिरेकी मोहम्मद मेराह याला पाकिस्तानात बसलेल्या तालिबानी वरीष्ठाकडून सूचना येत होत्या. त्यानुसार तो भारतीय दूतावासावर हल्ला करणार होता असा गौप्यस्फोट फ्रेंच वृत्तपत्र ‘ली मोंडे’ मध्ये केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०११च्या उन्हाळ्यात मोहम्मदला पाकिस्तानात तालिबानने प्रशिक्षण दिलं होतं. याच वर्षी मार्चमध्ये फ्रांसमधील तुळूज शहरातील एका ज्यू शाळेत गोळीबार केल्याचाही मेराहवर आरोप होता.
मेराहला मारण्याआधी ३२ तास सुरक्षा दलाचे सैनिक त्याच्या घराला घेराव घालून उभे होते. यच घरात सुरक्षा पथकाला मेराहबद्दलची अधिक माहिती मिळाली. पॅरीसमधील भारतीय दूतावासावर हल्ला करण्यासाठी मेराह आला होता. पण, त्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नव्हता.