पाक सरकारच्या वेबसाइटवर 'हिंदुस्तान झिंदाबाद'

पाकिस्तान सरकारची संघीय टॅक्स लोकपालची (FTO) वेबसाइट शुक्रवारी हॅक करण्यात आली. हॅकिंगनंतर या साइटवर ज्या प्रकारचा मजकूर दिसत आहे, त्यावरून तरी हे हँकिंग भारतीयांनीच केले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Updated: Mar 30, 2012, 05:32 PM IST

www.24taas.com, इस्लामाबाद

पाकिस्तान सरकारची संघीय टॅक्स लोकपालची (FTO) वेबसाइट शुक्रवारी हॅक करण्यात आली. हॅकिंगनंतर या साइटवर ज्या प्रकारचा मजकूर दिसत आहे, त्यावरून तरी हे हँकिंग भारतीयांनीच केले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

www.fto.gov.pk/  ही वेबसाइट पाकिस्तानातील करदात्यांसाठी तक्रार तसंच निर्णय समर्थन प्रणालीचे फायलिंग मजबूत करण्यासाठी बनवली गेली आहे. पण ही साइटही हाइक करण्यात आली. या वेबसाइट वरील ‘अबाऊट एफटीओ’ या पेजवर चक्क भगत सिंग, सुखदेव, राजगुरू या भारतीय क्रांतीवीरांचे चित्र लावण्यात आले आङे आणि ‘पाकिस्तान झिंदाबाद’ऐवजी ‘हिंदुस्तान झिंदाबाद’ असं लिहीण्यात आलं आहे.
या वेबसाइटवर पाकिस्तानी कायदेविषयक माहिती उपलब्ध असते. संस्थात्मक आणि व्यवस्थापनाची माहिती या वेबसाइटवर पाहिली जाते. याशिवाय इस्लामाबाद आणि इतर प्रांतीय कार्यालयांच्या सचिवांचे पत्ते या साइटवर असतात. इतकी महत्त्वाची साइट हॅक झाल्यामुळे पाकिस्तानी करवसूली कार्यालयांत  चिंतेचं वातावरण आहे.