www.24taas.com, मुंबई
कच्च्या तेलाच्या ग्रीक कंपनीच्या टँकरसह एका जहाजाचे अरबी समुद्रातून अपहरण करण्यात आल्या माहिती देण्यात आली आहे. हे जहाज तुर्कीहून सोमालियाकडे जात असताना ओमानच्या पूर्वेस ३०० सागरी मैल अंतरावर त्याचा संपर्क तुटला, असे अॅथेन्स वृत्त संस्थेने म्हटले आहे.
या जहाजावर सुमारे एक लाख ३५ हजार मेट्रिक टन कच्चे होते. भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी सकाळी कच्च्या तेलाच्या टँकरसह अरबी समुद्रातून जाणाऱ्या या जहाजाचा संपर्क तुटला. या टंकरवर लायबेरियाचा ध्वज होता, असे सांगण्यात येत आहे. ग्रीकच्या डायनॉकॉम टँकर्स मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीचा हा टँकर होता, या वृत्तसंथेने म्हटले आहे.
सोमालियाचा समुद्र मार्ग हा जगात सर्वात धोकादायक समजला जातो. गतवर्षी या मार्गावर २३० सागरी हल्ले करण्यात आले होते. डायनॉकॉम टँकर्स मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना जहाजाच्या अपहरणाबाबत माहिती देण्यात आली आहे.