न्यू यॉर्कमध्ये मंदिर, मशिदीवर हल्ला

अमेरिकेतल्या न्यू यॉर्क शहरमधील क्वीन्स भागात काही अज्ञात हल्लेखोरांनी दोन मंदिरं आणि एका मशिदीवर बॉम्बहल्ला केला. मंदिरावर झालेल्या हल्ल्यात मंदिराचा दरवाजा जळला. मंदिराबरोबरच शेजारील एका घरावरही हल्ला करत त्याचं नुकसान करण्यात आलं.

Updated: Jan 3, 2012, 07:52 PM IST

www.24taas.com, न्यू यॉर्क

 

अमेरिकेतल्या न्यू यॉर्क शहरमधील क्वीन्स भागात काही अज्ञात हल्लेखोरांनी दोन मंदिरं आणि एका मशिदीवर बॉम्बहल्ला केला. शहराच्या ज्या भागात हा हल्ला करण्यात आला, त्या भागात अशिया, आफ्रिका आणि लॅटीन अमेरिकेतील लोक मोठ्या संख्येने राहातात. या हल्ल्याद्वारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

 

या भागातील शिया मुस्लिमांच्या मोठ्या मशिदीच्या तसंच खुई सेंटरच्या मौलानांनी सांगितलं की मध्यरात्रीनंतर काही अज्ञात हल्लेखोरांनी पेट्रोल बॉम्ब फेकले. त्यामुळे मशिदीच्या दरवाजाला आग लागली. या वेळी मशिदीत जवळपास ८० लोकहजर होते. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, यात काही लोक जखमी झाले आहेत. मंदिरावर झालेल्या हल्ल्यात मंदिराचा दरवाजा जळला. मंदिराबरोबरच शेजारील एका घरावरही हल्ला करत त्याचं नुकसान करण्यात आलं.

 

न्यू यॉर्कच्या महापौरांनी या हल्ल्याची निर्भत्सना केली असून पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. हे हल्लेखोर जातीय सलोखा नष्ट करून लोकांना आपापसात लढण्यास उद्युक्त करत असल्याचंही महापौरांनी म्हटलं. मात्र, पोलिस लवकरच हल्लेखोरांना अटक करतील व गुन्हेगारांना कडक शासन केले जाईल असं अश्वासनही दिलं आहे.