न्यूयॉर्कच्या 'प्लाझा' हॉटेलला भारतीय 'सहारा'

सहारा ग्रुपने ५७ कोटी डॉलर्समध्ये न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित प्लाझा हॉटेल खरेदी केलं आहे. इस्राइलमधील एलाद प्रॉपर्टीज या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कजवळील १०५ वर्षं जुनं लक्झरी हॉटेल सहारा ग्रुपने खरेदी केलं आहे.

Updated: Aug 1, 2012, 11:47 AM IST

www.24taas.com, न्यूयॉर्क

सहारा ग्रुपने ५७ कोटी डॉलर्समध्ये न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित प्लाझा हॉटेल खरेदी केलं आहे. इस्राइलमधील एलाद प्रॉपर्टीज या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कजवळील १०५ वर्षं जुनं लक्झरी हॉटेल सहारा ग्रुपने खरेदी केलं आहे.

सध्या प्लाझा हॉटेलची मालकी इस्राइलच्या एलाद कंपनी आणि सौदी अरेबियन कंपनी किंग्डम होल्डिंग्स कंपनी यांच्याकडे आहे. या कंपन्यांकडून सहारा ग्रुपने प्लाझा हॉटेल विकत घेतलं आहे.

एलादच्या व्यापारावर इस्राइलच्या यितझाक शुवाचं नियंत्रण आहे. कंपनीला या व्यापारासाठी आप्लया ६०% वाट्यासाठी १.६ अब्ज सिकेल्स मिळतील तर बाकी पैसे सौदी अरेबियाच्या किंग्डम कंपनीला मिळतील.