नेपाळमध्ये विमानाला अपघात, ११ भारतीय ठार

उत्तर नेपाळमध्ये विमानाला अपघात झाला आहे. या विमानात २१ प्रवासी होते त्यापैकी १६ प्रवासी भारतीय होते. अपघातात सात भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते आहे. अग्नी एअरलाईन्सचं हे विमान होतं.

Updated: May 14, 2012, 08:07 PM IST

www.24taas.com, काठमांडू

 

उत्तर नेपाळमध्ये विमानाला अपघात झाला आहे. या विमानात २१ प्रवासी होते त्यापैकी १६ प्रवासी भारतीय होते. अपघातात ११ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते आहे. अग्नी एअरलाईन्सचं हे विमान होतं.

 

जॉमसॉम विमानतळावर लँडिंग करतेवेळी या विमानाला अपघात झाला. उत्तर नेपाळमध्ये या विमानाला अपघात झाला आहे. जॉमसॉम विमानतळावर लॅडिंग करताना अपघात झाला. अपघाताचे कारण अजूनही कळू शकलेले नाही.

 

विमानात २१ प्रवासी होते. २१ पैकी १६ भारतीय प्रवासी या विमानात होते. आणि त्यापैकी ११ भारतीय प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. तसेच हा अपघात अत्यंत भीषण असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.