तेरा वर्षांचा बापमाणूस ‘गूगल’

सुप्रसिद्ध इंटरनेट सर्च इंजिन गूगल या इंटरनेटवरील बेताज बादशाह असणाऱ्या साईटला १३ वर्ष पूर्ण झाली आहेत. मंगळवारी यशस्वीपणे गूगलने १३ व्या वर्षात पदार्पण केले.

Updated: Oct 9, 2011, 01:25 PM IST

झी २४ तास वेब टीम,  न्यूयॉर्क          

 

सुप्रसिद्ध इंटरनेट सर्च इंजिन गूगल या इंटरनेटवरील बेताज बादशाह असणाऱ्या साईटला १३ वर्ष पूर्ण झाली आहेत. मंगळवारी यशस्वीपणे गूगलने १३ व्या वर्षात पदार्पण केले. गूगलने आपला हा वाढदिवस त्यांचा होमपेजवर गूगल-डूडलच्या माध्यमातून सुद्धा साजरा केला.

 

[caption id="attachment_1093" align="alignleft" width="300" caption="गूगलचं 13 व्या वर्षात पदार्पण"][/caption]

गूगलचा लोगो हा रंगीबेरंगी फुगे, केक यामध्ये दाखविण्यात आला होता. गूगलचे संस्थापक लैरी पेज आणि सरगई ब्रिनने आपलं पहिलं सर्च इंजिन १९९६ मध्ये सुरू केलं होतं. परंतु ही कंपनी ४ सप्टें, १९९८ मध्ये रजिस्टर्ड करण्यात आली. गूगल डॉट कॉम हे डॉमिन १५ सप्टेंबरला रजिस्टर्ड झालं. पण अधिकृतरित्या गूगल आपला वाढदिवस २७ सप्टेंबरला साजरा करतो.

 

गूगल सर्च हे गेली १३ वर्ष अविरतपणे आपली सेवा देत आहे. गूगलने आजपर्यंत अनेक नवनवीन सेवा या ग्राहकांना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे काही दिवसापूर्वीच सोशल नेटवर्किंग साईटमध्ये पाऊल टाकले आहे. ‘गूगल प्लस’ या नावाने त्यांनी ही सोशल नेटवर्किंग साईट उपलब्ध केली आहे. अर्थातच सोशल नेटवर्कींग साईटमधील नंबर एक असणाऱ्या फेसबुकला ‘फेस’ करण्याचं किंवा त्याच्या तोंडाला ‘फेस’ आणण्याचं आव्हान त्यांचासमोर असणार आहे.