झरदारींनी दुबई दौरा गुंडाळला

पाकमध्ये लष्करी राजवट लागू होण्याची चिन्ह असताना पाकिस्तानचे राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांनी दुबई दौऱ्यावर जाण्याचा निर्णय केला होता. पाकमध्ये पुन्हा सरकावर ताबा लष्कर घेण्याची शक्यता असताना झरदारी यांनी आपला दौरा अर्ध्यावर सोडला.

Updated: Jan 13, 2012, 05:31 PM IST

www.24taas.com ,इस्लामाबाद

पाकमध्ये लष्करी राजवट लागू होण्याची चिन्ह असताना  पाकिस्तानचे राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांनी दुबई दौऱ्यावर जाण्याचा निर्णय केला होता. पाकमध्ये पुन्हा सरकावर ताबा लष्कर घेण्याची शक्यता असताना झरदारी यांनी आपला दौरा अर्ध्यावर  सोडला.

असिफ अली झरदारी  मायदेशी परतल्याचे वृत्त पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी आज शुक्रवारी दिले. जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रपतींचे प्रवक्ते फराहतुल्लाह बाबर यांनी सांगितले,  खासगी दुबई दौऱ्यानंतर झरदारी पाकिस्तानला परतले आहेत. त्यांच्या दुबई दौऱ्याबाबतचे तर्क  निरर्थक आहेत.

गेल्या महिन्यात झरदारी वैद्यकीय उपचारांसाठी दुबईला गेले होते. तेव्हा पाकिस्तानी लष्कराने त्यांना देश सोडण्यास भाग पाडले असेल किंवा लष्करी उठावाच्या भीतीने ते दुबईला गेले असतील, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मेमोगेट प्रकरणावरून पाकिस्तानी लष्कर आणि सरकारचे संबंध ताणले गेले असताना झरदारी यांच्या दुबई दौऱ्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. ते पुन्हा पाकिस्तानमध्ये परतल्याने यावादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. असे असले तरी त्यांच्यावरील संकट टळलेले नाही.