www.24taas.com, वॉशिंग्टन
कमी वयातच विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राला हातभार लावणाऱ्या ९६ तरुण संशोधकांना अमेरिका सरकारतर्फे नुकतेच पुरस्कार घोषित करण्यात आलेत. यापैकी चार जण भारतीय वंशाचे आहेत. पुरस्कार विजेत्यांचा राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते गौरवण्यात आलं.
‘विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवनवीन प्रयोगाची संधी या देशाच्या अर्थव्यवस्थेची मजबुतीसाठी आवश्यक अशीच गोष्ट आहे पण त्यासोबतच ते आपल्यालाही वेगवेगळ्या आव्हानांसाठी खुणावतात,’ असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या पुरस्कारांची घोषणा करताना म्हटलंय. खूप लहान वयात या तरुणांनी मिळवलेलं हे यश निश्चितच पुढेही देशाच्या उपयोगी पडेल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केलीय. १९९६ साली तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी तरुणांमध्ये संशोधनाविषयी क्रेझ निर्माण करण्यासाठी या पुरस्कारांची सुरूवात केली होती.
मेन्सेच्युसेंटस् जनरल हॉस्पिटल आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलचे बिजू पारेक्कदन, मेन्सेच्युएट्स इन्स्टियुट ऑफ टेक्नोलॉजीचे पवन सिन्हा आणि पराग पाठक तसंच जॉन हाफकिन्स युनिव्हर्सिटीचे श्रीदेवी वेंदुला सरमा या चार भारतीय-अमेरिकन संशोधकांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.
.