इंडिया- ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या धमाक्याला आजपासून सुरुवात

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या धमाक्याला आजपासून सुरुवात होणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 9, 2013, 11:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या धमाक्याला आजपासून सुरुवात होणार आहे. दोन्ही टीम्समध्ये होणारी एकमेव टी-२० लढत ही रोजकोटमध्ये रंगणार आहे. भन्नाट फॉर्ममध्ये असलेली टीम इंडियामध्ये युवराज सिंगने कमबॅक केल्याने टीम इंडियाला अधिकच मजबूती आली आहे. तर नवखी असलेली ऑस्ट्रेलिया टीम त्यामानाने कमकुवत वाटत आहे.
क्रिकेटविश्वात धोकादायक अशी ख्याती प्राप्त केलेल्या कांगारुंना 4 टेस्टच्या सीरिजमध्ये क्लिन स्विप दिल्यानंतर आता वन-डे सीरिजमध्येही त्यांना धूळ चारण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सात वन-डे आणि एक टी-२० मॅच खेळली जाणार आहे. राजकोट इथं एकमेव टी-२० चा मुकाबला रंगणार आहे. भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या टीम इंडियामध्ये टी-२० स्पेशलिस्ट युवराज सिंगने कमबॅक केल्यामुळे टीम इंडियाला अधिकच मजबूती आली आहे. कांगारु बॉलर्ससमोर टीम इंडियाच्या तगड्या बॅटिंग लाईन-अपच आव्हान असेल. शिखर धवन आणि रोहित शर्माचा पुन्हा एकद ओपनिंग धमाका पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उतावीळ झाले असतील. सध्या जबरदस्त फॉर्मात असेलला विराट कोहली, चॅम्पियन्स लीगमध्ये चांगली कामगिरी करणारा सुरेश रैना, कमबॅक केलेला युवराज सिंग आणि दोन महिन्यांनंतर परतलेला महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांच्यावर मिडल ऑर्डरची भिस्त असेल. तर आर. अश्विनबरोबर होम ग्राऊंडवर आपली पहिलीच टी-२० इंटरनॅशनल मॅच खेळणा-या रवींद्र जाडेजाची फिरकी कमाल करण्यास सज्ज असेल. याशिवाय युवी आणि रैनाची फिरकीही त्यांच्या मदतीला असेल. तर ईशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार जोडीवर फास्ट बॉलिंगची जबाबदारी असेल. मोहम्मद शमी, विनय कुमार आणि जयदेव उनाडकत यापैकी कोणाला संधी दिली जाते हे पहाव लागेल. तर दुसरीकडे सीरिज सुरु होण्यापूर्वी माइकल क्लार्कने दुखापतीमुळे माघार घेतल्याने ऑस्ट्रेलिया टीमला धक्का बसलेला आहे. भारतीय दौ-यावर आलेल्या 14 सदस्यीय ऑस्ट्रेलियन टीमपैकी केवळ 6 प्लेअर्सनाच भारतात खेळण्याचा अनुभव आहे.
यापैकी एकही बॅट्समन भारतात सेंच्युरी झळकावू शकलेला नाही. फास्ट बॉलर मिचेल जॉन्सन हा सध्याच्या ऑस्ट्रेलिया टीममधील सर्वाधिक अनुभवी प्लेअर आहे. जॉन्सनसहित शेन वॉटसन, ब्रॅड हॅडिन, कॅप्टन जॉर्ज बेलीवरच प्रामुख्याने कांगारुंची भिस्त असेल. याशिवाय काही टॅलेंटेड युवा प्लेअर्स मिळालेल्या संधीचा फायदा उठवतात का यावरही बरच अवलंबून असेल. चॅम्पियन्स ट्रॉफी, वेस्ट इंडिज सीरिज आणि झिम्बाब्वे सीरिज जिंकत हॅटट्रीक साधणारी टीम इंडिया आता आपली विजयी मालिका कायम राखते का याकडेच तमाम भारतीय क्रिकेट फॅन्सच लक्ष लागून राहिल आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.