‘सिक्सर किंग’ युवीचं टीम इंडियात होणार कमबॅक!

ऑस्ट्रेलियारविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांसाठी चेन्नईमध्ये आज टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. देशातील स्पर्धा आणि वेस्ट इंडिज `ए`विरुद्ध प्रभावशाली कामगिरी करणाऱ्या युवराज सिंगच कमबॅक निश्चित मानलं जात आहे. याशिवाय झिम्बाब्वे दौऱ्यायाठी धोनीसह विश्रांती देण्यात आलेल्या खेळांडूंचाही टीममध्ये समावेश करण्यात येणार आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 30, 2013, 09:06 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, चेन्नई
ऑस्ट्रेलियारविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांसाठी चेन्नईमध्ये आज टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. देशातील स्पर्धा आणि वेस्ट इंडिज `ए`विरुद्ध प्रभावशाली कामगिरी करणाऱ्या युवराज सिंगच कमबॅक निश्चित मानलं जात आहे. याशिवाय झिम्बाब्वे दौऱ्यायाठी धोनीसह विश्रांती देण्यात आलेल्या खेळांडूंचाही टीममध्ये समावेश करण्यात येणार आहे.
वेस्ट इंडिज सीरिज, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि झिम्बाब्वे सीरिजमध्ये सलग तीन विजेतेपद पटकावल्यानंतर आता टीम इंडियाला कांगारुंच्या आव्हानाला सामोर जावं लागणार आहे. ऑस्ट्रेलिया टीम भारताच्या दौऱ्यावर येत असून १० ऑक्टोबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान एक टी-२० आणि चार वन-डेची सीरिज खेळली जाणार आहे. या सीरिजसाठी बऱ्याच कालावधीपासून टीम इंडिया बाहेर असलेल्या सिक्सर किंग युवराज सिंगसाठी टीम इंडियाची दार उघडण्यात येणार आहेत. याशिवाय झिम्बाब्वे दौऱ्यासाठी धोनीसहित ज्या प्लेअर्सना विश्रांती देण्यात आली होती त्यांचही कमबॅक होईल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडियाच्या बॅटिंग लाईनअपमध्ये बदल करण्याची शक्यताच नाही.
ओपनिंगला क्लिक झालेली शिखर धवन आणि रोहित शर्माची जोडीच ओपनिंगसाठी ठेवण्यात येईल. तर विराट कोहली, सुरेश रैना, महेंद्र सिंग धोनी हे मिडल ऑर्डर बॅट्समन असतील. ऑल आऊंडर रवींद्र जडेजाबरोबर आता युवराज सिंगचाही टीममध्ये समावेश निश्चित मानण्यात येत आहे.
तर बॉलिंगमध्ये आर. अश्विनच्या झिम्बाब्वे दौऱ्यावर चांगली कामगिरी करणाऱ्या अमित मिश्राचाही टीममध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव या तिगडीवर पुन्हा फास्ट बॉलिंगची जबाबदारी सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. तर झिम्बाब्वे दौऱ्यात मोहित शर्मा आणि जयदेव उनाडकत या दोघांनीही चांगली कामगिरी केल्यामुळं या दोघांमध्ये एक्स्ट्रा फास्ट बॉलरसाठी चांगलीच चुरस पहायला मिळेल. याशिवाय दिनेश कार्तिकचा टीममध्ये रिझर्व्ह प्लेअर म्हणून समावेश होतो का हे पहावं लागेल. तर दुखापतग्रस्त इरफान पठाणच्या जागी अभिषेक नायरला संधी मिळण्याची शक्यता आहे.
वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि झहीर खान या तिघांनाही टीममध्ये पुन्हा संधी मिळण्याची शक्यता अजिबातच नाही. मात्र NKPसाळवे चॅलेंजर टूर्नामेंट आणि वेस्ट इंडिज `ए`विरुद्ध प्रभावशाली कामगिरी करणाऱ्या युवीचं कमबॅक हेच क्रिकेटप्रेमींसाठी चर्चेचा विषय ठरणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.