योगमुळे बलात्काराच्या घटना कमी होतील

भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी प्रत्येक माणसाने जीवनात योग केला, तर देशात बलात्काराच्या घटना कमी होतील, असं म्हटलं आहे..

Updated: Feb 23, 2015, 11:31 PM IST
योगमुळे बलात्काराच्या घटना कमी होतील title=

नवी दिल्ली : भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी प्रत्येक माणसाने जीवनात योग केला, तर देशात बलात्काराच्या घटना कमी होतील, असं म्हटलं आहे..

तसेच मुस्लीम दिवसातून पाच वेळेस योग करतात, मोहंमद पैगम्बर हे सर्वात महान योगी होते,असं त्यांनी म्हटलंय, मुरली मनोहर जोशी यांचं हे वक्तव्य वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

जोशी म्हणाले, "योग केल्याने पुरूष आणि महिलांमध्ये एक नवीन विचार पुढे येईल, मानव शरीराविषयी विचार करण्याचा दृष्टीकोन बदलेल, शरीर हे एक असं मशीन आहे,  निसर्गाने एका महान उद्देशासाठी याची निर्मिती केली आहे". 

मुरली मनोहर जोशी, पुढे बोलतांना म्हणाले, "आपले मुस्लिम बांधव दिवसातून पाच वेळेस योग करतात, नमाजासाठी बसण्याची मुद्रा पाहा, दोन किंवा तीन मुद्रा. मला वाटतं मोहम्मद पैगंबर एक महान योगी होते, ईश्वराशी प्रार्थना करण्याची ही पद्धत आपल्याला योगशी जोडते, योगाचा अभ्यास केल्याशिवाय आपण हे करू शकत नाही".

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.