विद्यार्थ्याच्या प्रेमात वेड्या या शिक्षिकेने उचललं हे पाऊल

शिक्षिका आणि या विद्यार्थ्यामध्ये २ वर्षांपासून प्रेमाचे संबंध होते.

Updated: May 18, 2016, 05:20 PM IST
विद्यार्थ्याच्या प्रेमात वेड्या या शिक्षिकेने उचललं हे पाऊल title=

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये एक महिला शिक्षिका विद्यार्थ्यांच्या प्रेमात पडली आणि त्याला घेऊन फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिसात याबाबतची तक्रार नोंदवली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार महिला शिक्षिका आणि या विद्यार्थ्यामध्ये २ वर्षांपासून प्रेमाचे संबंध होते.

२५ वर्षीय या शिक्षिकेने या विद्यार्थ्याला ट्युशनसाठी घरी बोलवणं सुरु केलं त्यानंतर यांच्यात संबंध वाढले. फरार होण्यापूर्वी या विद्यार्थ्याने तो अत्याकडे चालला आहे असं सांगून निघाला पण घरी पुन्हा आलाच नाही. काही लोकांनी सांगितलं की तो त्याच्या शिक्षिकेसोबत दिसला होता. त्यानंतर त्याचे पालक त्या शिक्षिकेच्या घरी पोहोचले पण ती शिक्षिकाही फरार झाली होती. यानंतर या शिक्षिकेविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली गेली आहे.