नवी दिल्ली : एकीकडे सरकार महिला सशक्तीकरणाची गोष्ट करत आहे तर दुसरीकडे महिला पोलिसांचे कशा प्रकारे हाल होतात हे एका सर्वेमधून समोर आलंय.
एका सर्वेमध्ये असं निदर्शनास आले आहे की शौचालयात जाऊ लागू नये म्हणून महिला पोलीस पाणी पिणे टाळतात.
असुविधाजनक ड्युटी आणि प्रायवसी मिळत नसल्याचं या सर्वेमधून समोर आलंय. महिला पोलिसांना जे संरक्षणासाठी जॅकेट दिले आहेत ते एवढे घट्ट आहेत की त्यांना श्वास घेतांना मोठा त्रास होतो.
ब्यूरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेवलपमेंट आणि सीआरपीएफने केलेल्या या सर्वेमध्ये असं सांगण्यात आलं की त्यांना कपडे बदलण्यासाठी, कपडे धुवण्यासाठी आणि कपडे सुकवण्यासाठी देखील योग्य जागा मिळत नाही.