‘हुकूमशहा असतो तर पहिलीपासून गीता पढवली असती’

‘मी हुकुमशहा असतो तर पहिल्या इयत्तेपासून मुलांना महाभारत आणि भगवद्गीत शिकवणे बंधनकारक केलं असतं’ असं वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए. आर. दवे यांनी व्यक्त केलंय.

Updated: Aug 3, 2014, 11:41 AM IST
‘हुकूमशहा असतो तर पहिलीपासून गीता पढवली असती’ title=

अहमदाबाद : ‘मी हुकुमशहा असतो तर पहिल्या इयत्तेपासून मुलांना महाभारत आणि भगवद्गीत शिकवणे बंधनकारक केलं असतं’ असं वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए. आर. दवे यांनी व्यक्त केलंय.

अहमदाबादमध्ये शनिवारी समकालीन प्रश्न आणि जागतिकीकरणातली आव्हाने या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना दवे यांनी हे वक्त्य केल्यानंतर नवा वाद निर्माण झालाय. या संमेलनाचं आयोजन गुजारात लॉ सोसायटीनं केलं होतं.

‘जर, कुणी मला धर्मनिरपेक्ष आहे किंवा धर्मनिरपेक्ष नाही असं म्हटलं तर मला खेद होईल... पण, जर काही चांगले असेल तर ते आपण कुठूनही घ्यायला हवं…’, असंही दवे यांनी यावेळी म्हटलंय.

दवे यांच्या म्हणण्यानुसार, ‘भारताला आज आपल्या प्राचीन परंपरांकडे वळण्याची आवश्यकता आहे. गुरु-शिष्य सारख्या प्राचीन परंपरा असत्या तर देशात हिंसा, दहशतवादासारख्या समस्या नसत्या’ असं दवे यांनी म्हटलंय.  

दवे यांच्या या वक्तव्यावर भाजपनं त्यांची पाठराखण केलीय. न्या. दवेंच्या विधानांचा धार्मिक अर्थ काढू नये, असं मत भाजपा खासदार योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केलंय. तर, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी अशा प्रकारचे विधान करणं दुर्दैवी असल्यानं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेनन यांनी व्यक्त केलंय.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.