www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई
आतापर्यंत आपण लोकलमध्ये चालत्या रेल्वेमध्ये प्रसुती झाल्याचे ऐकले होते. पूर्वी बैलगाडीतच प्रसुती व्हायची. पण चेन्नईच्या मारिअम्मा नावाच्या महिलेवर अशी काही परिस्थिती उद्भवली की तिची रुग्णालयात जाताना रिक्षामध्येच प्रसुती झाली आणि तिने एका गोंडस कन्येला जन्म दिला.
आठ महिन्याची गर्भवती असणा-या मारिअम्माला बुधवारी दुपारी अचानक प्रसूतीवेदना सुरु झाल्या. पती ईझहूमलाईने मारिअम्माला घेऊन क्रॉमपेट जनरल रुग्णालयात जाण्यासाठी रिक्षा पकडली.
रिक्षा रुग्णालयाच्या प्रवेशव्दारावर असतानाच, मारिअम्माच्या प्रसूतीवेदना प्रचंड वाढल्या व तिने रिक्षातच कन्यारत्नाला जन्म दिला. रिक्षाचालक आणि ईझहूमलाईने लगेचच आई आणि मुलीला रुग्णालयात दाखल केले. दोघांच्याही प्रकृतीला कुठलाही धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे रिक्षाचालक वेंकटेश म्हणाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.