मुस्लिम महिलेचा आरोपः BJPसाठी कामामुळे माझ्यावर गँगरेप

भाजपसोबत काम करीत होते म्हणून सुमारे १२ जणांनी माझ्यावर गँगरेप केल्याचा आरोप एका मुस्लिम महिलेने झारखंडमध्ये केला आहे. ही महिला भाजपच्या स्थानिक अल्पसंख्यांक युनिटमध्ये काम करीत आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 29, 2014, 06:18 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, रांची
भाजपसोबत काम करीत होते म्हणून सुमारे १२ जणांनी माझ्यावर गँगरेप केल्याचा आरोप एका मुस्लिम महिलेने झारखंडमध्ये केला आहे. ही महिला भाजपच्या स्थानिक अल्पसंख्यांक युनिटमध्ये काम करीत आहे.
या संदर्भात मंगळवारी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. गेल्या सोमवारी एका जमावाने तिच्या घरावर हल्ला केला. तिच्या पतीचे हात बांधले आणि तसेच १३ वर्षांच्या मुलीसह विचित्र वागणूक केली.
झारखंड पोलिसांच्या प्रवक्ता अनुराग गुप्ता यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पण अद्याप या महिलेचे आरोप सिद्ध झाले नाहीत. हे प्रकरण राजकीय भावनेने प्रेरित असू शकते.
गुप्तांनी वृतसंस्था एएफपीला सांगितले की, पोलिस सर्व तथ्यांची चौकशी करीत आहे आणि आताच या घटनेबाबत भाष्य करणे कठीण जाणार आहे. महिलेच्या घराजवळ असलेल्या पोलिस ठाण्याचे इन्चार्ज टीएन सिंह यांनी सांगितले की, काही लोक मशीदीच्या लाउडस्पीकरवर हल्लाची माहिती सर्व गावाला दिली त्यानंतर हल्लेखोर पळू गेले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.