'पेट्रोल हवे असेल तर हेल्मेट वापरावेच लागेल'

हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना मध्य प्रदेशमध्ये पेट्रोल दिले जाणार नाहीये. बुधवारपासून हा नवा नियम लागू करण्यात आलाय. 

Updated: Feb 8, 2016, 02:35 PM IST
'पेट्रोल हवे असेल तर हेल्मेट वापरावेच लागेल' title=

भोपाळ : हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना मध्य प्रदेशमध्ये पेट्रोल दिले जाणार नाहीये. बुधवारपासून हा नवा नियम लागू करण्यात आलाय. राज्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश देण्यात आलेत. 

तसेच या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या पेट्रोल पंपाच्या मालकांविरोधात आवश्यक वास्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कारवाई केली जाईल असेही राज्य सरकारने सांगितलेय. 

पूर्व विभागात यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले होते. मात्र जनहित याचिका सादर केल्यानंतर या आदेशाल स्थगिती देण्यात आली होती. हायकोर्टाच्या इंदौर खंडपीठाने याबाबतच्या सर्व याचिका रद्द केल्या. त्यानंतर हेल्मेटशिवाय दुचाकीस्वारांना पेट्रोल न देण्याचे आदेश देण्यात आलेत.  

दरम्यान, हेल्मेट सक्तीबाबत आता महाराष्ट्र सरकारच्या काय उपाययोजना करतेय याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.